घरमहाराष्ट्रसंजय राऊत यांना पदावरून हटवा

संजय राऊत यांना पदावरून हटवा

Subscribe

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकापासून सुरू झालेला वाद क्षमण्याचे नाव घेताना दिसत नाही. या पुस्तकावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने ठाकले असताना आता या वादात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी देखील उडी घेतली आहे. छत्रपती उदयनराजे यांना शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणार्‍या संजय राऊत यांच्याविरोधात आज(शुक्रवारी) संभाजी भिडे यांनी सांगली बंदची हाक दिली. संजय राऊत यांनी ठिणगीला पाय लावला आहे. ते त्या स्थानावर राहता कामा नये. संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती आहे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

छत्रपतींकडे पुरावे मागणारे अश्लाघ्य वक्तव्य राऊत यांनी केले आहे. आमचा हा बंद शिवसेनेच्या विरोधात नाही. शिवसेनेचे काम संबंध देशभर पसरले आहे. पण एखादा नेता बेताल वक्तव्य करत असेल. तर उद्धव ठाकरेंसारख्या चाणाक्ष व्यक्तीने समाजस्वास्थ बिघडवणार्‍या अशा व्यक्तीला तत्काळ पदावरून दूर केले पाहीजे. या मागणीसाठी आमचा बंद आहे,असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. तसेच संजय राऊत असो किंवा गोयल असो, शिवरायांच्या परंपरेला कलंक लागेल असे वागलेले चालणार नाही,असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

शिवसेना विवेकी, त्यांचा बंदला विरोध नाही

शिवसेनेचा बंदला विरोध असल्याचा प्रश्न पत्रकारांनी संभाजी भिडे यांना विचारल्यानंतर भिडे यांनी शिवसेनेचे मात्र कौतुक केले. शिवसेना छत्रपतींचे कार्य करत आहे. मात्र कुणी काही बोलून छत्रपतींच्या परंपरेला गालबोट लावत असेल तर शिवसेनेने कारवाई करावी. आपण पिंडीला पाय लावून झोपत नाही. राऊत यांनी पिंडीला पाय लावण्याचे पाप केले आहे. शिवसेना विवेकी आहेत, ते आमच्या बंदला विरोध करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया भिडे यांनी दिली.त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी हा बंद मागे घेण्याची मागणी भिडे यांच्याकडे केली.

- Advertisement -

बंद हे षड्यंत्र – सुप्रिया सुळे

सांगली बंदमागे राजकीय षड्यंत्र असल्याचे वाटत आहे. कारण मुख्यमंत्री दौर्‍यावर येणाच्या पार्श्वभूमीवर हा बंद योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. ज्या छत्रपतींनी कष्ट करायला शिकवल, त्यांच्यासाठी बंद करणे हे मला पटत नाही. तसेच संजय राऊत यांनी इंदिरा गांधीबाबतचे वक्तव्य मागे घेतले आहे. त्यामुळे हा विषय इथेच थांबवून राज्यासमोर जी आव्हाने आहेत, त्याकडे लक्ष दिले पाहीजे, असेही सुळे पुणे येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

तर जनता माफ करणार नाही- संजय राऊत

संभाजी बिडे यांच्या सांगली बंदच्या हाकेनंतरही संजय राऊत यांनी देखील माघार घेतलेली नाही. काही राजकीय बेरोजगारांना कंत्राटी कामगार म्हणून राज्यात काम मिळाले आहे. त्याचा लाभ त्या मंडळींनी जरूर घ्यावा..पण राज्य अशांत कराल तर जनता माफ करणार नाही,असे राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -