घरमहाराष्ट्रनिवासी डॉक्टरांना मिळणार त्यांचे रखडलेले विद्यावेतन

निवासी डॉक्टरांना मिळणार त्यांचे रखडलेले विद्यावेतन

Subscribe

पाच महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्यामुळे निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, निवासी डॉक्टरांचं रखडलेलं विद्यावेतन देऊ असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिले आहे.

राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना पाच महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेलं नाही. रखडलेल्या विद्यावेतनामुळे निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने म्हणजेच डीएमईआरने येत्या काही दिवसांत निवासी डॉक्टरांचं रखडलेलं विद्यावेतन देऊ असं आश्वासन दिले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तात्पुरता संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राज्यातील लातूर, नागपूर, अंबेजोगाई आणि अकोला या चार सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना गेल्या ५ महिन्यांपासून स्टायपेंड मिळालेलं नाही.  या चारही वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात डॉक्टरांचं रखडलेलं विद्यावेतन तातडीने देण्याचे आश्वासन देत संप न करण्याची विनंती केली.

मानधनाच्या मुद्द्यावरून लातूर आणि अंबेजोगाईतील निवासी डॉक्टरांनी संपाचा निर्णय घेतला होता. याबाबत रुग्णालय अधिष्ठातांना पत्रही पाठवलं होतं. पण डीएमईआरनं येत्या १० एप्रिलपर्यंत वाट पाहायला सांगितलं आहे. सर्व रखडलेलं मानधन तातडीनं देऊ, असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आता तात्पुरता संप मागे घेण्यात आला आहे.
– डॉ. कल्याणी डोंगरे, केंद्रीय मार्डच्या अध्यक्ष
- Advertisement -

हेही वाचा –विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांचा काळ्या फिती लावून निषेध!

चार सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे रखडलेले ४ महिन्यांचं विद्यावेतन तातडीने देण्यात आलं आहे तर उर्वरित मानधन लवकरच देण्याचा आम्ही प्रयत्न करू. या दरम्यान डॉक्टरांनी संपाचं हत्यार उगारू नये म्हणून सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून तशी विनंतीही केली होती. त्यानुसार डॉक्टरांनी संप केला नाही.
– डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे अतिरिक्त संचालक 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -