घरमहाराष्ट्रभाजपच्या नगरसेविकेडून महिला डॉक्टरला मारहाण!

भाजपच्या नगरसेविकेडून महिला डॉक्टरला मारहाण!

Subscribe

.या प्रकरणी कोंंढरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांनी ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मंगळनारी मध्यरात्री आरती यांनी ससून रुग्णालयातील एका निवासी महिला डॉकटरला बेदम मारहाण केली. एका रुग्णावर उपचार करण्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी डॉक्टरला मारल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडिता निवासी डॉक्टर स्‍नेहल खंडागळे यांनी, कोंंढरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात अनेकविध चर्चांना उधाण आल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर घटना…

मंगळवारी रात्री ससून रुग्णालयाच्या आपातकालीन कक्षात डॉ. स्‍नेहल खंडागळे ड्युटीवर होत्या. मध्यरात्री रात्री साडेबाराच्या सुमारास अपघातातील तीन जखमींना ससून रुग्णालयात तातडीने दाखल केले गेले. दरम्यान, यावेळी भाजपच्या स्थानिक नगरसेविका आरती कोंढरे तिथे आल्या. त्यावेळी डॉ. खंडागळे या त्यातीलच एका रुग्णावर उपचार करण्यात व्यग्र होत्या. मात्र, कोंढरे यांनी अचानक दुसऱ्या अपघातग्रस्त रुग्णाजवळ जाऊन तिथे उपचारासाठी कुणीच नाही, अशी बोंबाबोंब सुरु केली. हा हा रुग्ण सिरीयस असून त्याच्यावर लवकर उपचार करा, अशी ओरड त्यांनी सुरु केली. त्यावेळी सदर रुग्णावर प्राथमिक उपचार झाल्याचं डॉ. खंडागळे यांनी सांगितलं पण कोंढरे यांनी आपला रेटा लावून धरला. यावरुनच त्या दोघींमध्ये काही वेळानंतर बाचाबाची झाली.

- Advertisement -

दरम्यान, कोंढरे यांनी तुझे नाव काय तुझी तक्रार अधिष्टातांकडे करते, असे म्‍हणत कोंढरे मोबाईलवर व्हिडिओ शुटिंग करु लागल्या. व्हिडिओ शुटिंग करु नका अशी विनंती डॉक्टरांनी करुनही त्या थांबल्या नाहीत. अखेर डॉ. स्‍नेहल यांनी हात उचलत डॉ. खंडागळे यांना मारायला सुरुवात केली. याप्रकरणी कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -