घरताज्या घडामोडीराज्यात रेस्टॉरंट्स, बार उघडण्याच्या नवीन वेळा जाहीर; शासन आदेश जारी!

राज्यात रेस्टॉरंट्स, बार उघडण्याच्या नवीन वेळा जाहीर; शासन आदेश जारी!

Subscribe

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने राज्यात रेस्टॉरंट आणि बार पुन्हा सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता त्यासंदर्भात नवीन शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे. या आदेशांनुसार राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार कोणत्या वेळेत उघडावेत आणि बंद करावेत, यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. नवीन शासन आदेशांनुसार राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार सकाळी ८ वाजता उघडण्याची तर रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री बरोबर १० वाजता हे बंद व्हायला हवेत असं देखील या शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी जरी हा निर्णय जाहीर केला असला, तरी संबंधित महानगर पालिका किंवा जिल्हा प्रशासन यासंदर्भात वेगळा निर्णय घेऊन वेळेसंदर्भात वेगळे निर्देश देऊ शकतात, असं देखील या आदेशात म्हटलं आहे.restaurants bars opening closing timing in maharashtra

मागील आठवड्यात राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ५ ऑक्टोबरपासूनच राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार सुरू झाले आहेत. ५० टक्के ग्राहक क्षमतेची मुख्य अट सरकारकडून घालण्यात आली आहे. अनलॉक – ५ च्या मार्गदर्शक सूचनांसदर्भात निर्णय घेतानाच राज्य सरकारने रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि बार सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात होती. अखेर त्यासंदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, आता रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे आणि इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत. याशिवाय, हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये पाळण्यासाठी काही इतर मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -
एसओपीमध्ये पुढील प्रमाणे सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
  • कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा.
  • सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा.
  • खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे.
  • आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी. संबंधीत आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत.
  • डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी.
  • रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी. काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे.
  • शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्य असल्यास दारे – खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, एसीचा वापर टाळावा. एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्या. क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेनुकार्ड उपलब्ध करावे. कापडाच्या नॅपकिनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकिनचा वापर करावा. टेबलांच्यामध्ये किमान १ मीटर अंतर राहील याप्रमाणे रेस्टॉरंट, बार यांच्या रचनेमध्ये आवश्यक बदल करण्यात यावा.
  • ग्राहकाच्या मागणीनुसार बाह्यबाजू निर्जंतुक केलेली पाण्याची बाटली किंवा फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करावे. मेनुमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा. शक्य असल्यास सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत.
  • प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. टेबल, खुर्च्या, काऊंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बुफे सेवेला परवानगी नसेल. जिथे शक्य असेल तिथे मेनुमध्ये प्री – प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन देण्यात यावे.
  • प्लेटस्, चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि संमत असलेल्या मान्यताप्राप्त डिसइन्फेक्टंटनी (जंतुनाशक) धुवावीत. सेवा देण्याच्या वस्तु, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाईज केलेल्या कपबोर्डमध्ये ठेवावीत. भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरावेत.
  • ग्राहकांनी वापरलेली भांडी एका बाजुला जमा न करता ती तातडीने धुण्यासाठी न्यावीत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी माहिती घेण्यात यावी.
  • करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल. तसेच बिलीयर्डस, डार्टस्, व्हीडीओ गेम्स आदी गेम क्षेत्रास मनाई असेल.
  • इनडोअर आणि आऊटडोअर कार्ड रुमला मनाई असेल.
  • सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमीत कोव्हीड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. एन ९५ किंवा याच दर्जाचा मास्क कर्मचारी वापरतील याची खात्री करावी. परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवसातून दोनवेळा परिसर सॅनिटाईज करावा. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -