घरताज्या घडामोडीखुषखबर : उद्योगांसाठी ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पुन्हा सुरु; निमाच्या पाठपुराव्यास यश

खुषखबर : उद्योगांसाठी ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पुन्हा सुरु; निमाच्या पाठपुराव्यास यश

Subscribe

वैद्यकीय गरजेला प्राधान्य देण्यासाठी उद्योगांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यास मर्यादा घालण्यात आल्यानंतर आजपर्यंत ११६ खाजगी कंपन्यांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज दाखल केले. ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा आता पुरेसा होत असल्याने वैद्यकीय वापराची गरज भागत आहे. त्यामुळे आता उद्योगांसाठी सिलेंडर वितरित करण्याची सूचना जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक भामरे व अतुल दवंगे यांनी पुरवठादारांना केली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. परिणामी जास्तीत जास्त ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटला उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्याकडून देण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन उत्पादक पुर्नभरण हे ज्या उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करतात त्यांनी औद्योगिक कारणासाठी लागणार पुरवठा तत्काळ काही काळाकरिता आदेश येईपर्यंत पूर्णतः बंद करण्यात आले होते. मात्र आता वैद्यकीय मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहेत. आजपर्यंत ११६ खाजगी कंपन्यांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध व्हावे यासाठी अर्ज दाखल केले आहेत. ज्या उद्योगांत ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केला जातो त्यातील कामगारांची एकूण संख्या ही १८ हजार इतकी आहे. तर सिलेंडरची मागणी १ हजार ३९४ इतकी आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्राला पुरेल इतके सिलेंडर्स उपलब्ध होत आहेत. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक भामरे व अतुल दवंगे यांनी सगळ्या ऑक्सिजन पुरवठादारांना बोलावून याबाबतची माहिती दिली. तसेच आजपासूनच ऑक्सिजन सिलेंडर वितरित करण्याचे सांगितले .

- Advertisement -

उद्योजकांना काम करणे सुकर झाले :

Nima Nashik

निमाच्यावतीने अध्यक्ष शशिकांत जाधव , मानद सरचिटणीस तुषार चव्हाण , खजिनदार कैलास आहेर सहसचिव सुधाकर देशमुख यांनी जिल्हा उद्योग केंद्राशी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक उद्योगांसाठी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्याकडून आदेश मंजूर करून घेतले आहेत. कोविड महामारी दरम्यान जिल्ह्यातील उद्योग आधीच मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले असताना तसेच उद्योग कसे चालवावे असा यक्ष प्रश्न सर्वांसमोर निर्माण झालेला असतांना सिलेंडर पुरवठ्याच्या आदेशामुळे उद्योजकांना काम करणे सुकर झाले आहे.

- Advertisement -

खुषखबर : उद्योगांसाठी ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पुन्हा सुरु; निमाच्या पाठपुराव्यास यश
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -