घरमहाराष्ट्रपाहणी खड्ड्यांची, पाठराखण राम कदमांची!

पाहणी खड्ड्यांची, पाठराखण राम कदमांची!

Subscribe

भाजप आमदार राम कदम यांनी महिलांसंदर्भात दहीहंडीदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली आहे. राम कदम यांच्या माफीनंतर हा विषय संपल्याचं पाटील म्हणाल आहेत. त्यामुळे राम कदमांच्या राजीनाम्याच्या मागणीचं काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

‘राम कदम’ हा विषय सध्या भाजपच्या कोण्याही नेत्यासाठी अडचणीचा ठरू लागला आहे. घाटकोपरमध्ये दहीहंडीदरम्यान मुलींनी पळवून आणण्यासंदर्भात भाजपचे आमदार राम कदम यांनी बेताल आणि आक्षेपार्ह विधान केलं. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. आधी त्यांच्या विधानासाठी बचाव आणि आता त्यांच्या माफीची पाठराखण अशा विचित्र कचाट्यात सध्या भाजपचे सर्वच नेते अडकले आहे. साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांसोबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घालत राम कदमांवर कारवाईसाठी विचारणा केल्यांनंतर आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारून अडचणीत आणले. पण सावध भूमिका घेण्याऐवजी चंद्रकांत पाटलांनी सरळ राम कदम यांच्या माफीची पाठराखण केली आहे. एवढंच नाही, तर राम कदमांवर त्यांनी स्तुतीसुमनं देखील उधळली आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – राम कदमांची जीभ छाटणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस


राम कदम यांचा इतिहास वेगळा आहे. ते त्यांच्या मतदारसंघात रक्षाबंधनाचा मोठा कार्यक्रम करतात. हजारो महिला त्यांना राखी बांधतात. ते अनेक समाजोपयोगी कामे करतात.

चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

- Advertisement -

‘राम कदम हा विषय संपला’

शुक्रवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पनवेलमध्ये खड्डेमय झालेल्या रस्त्यांची पाहाणी केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना राम कदम यांच्याविषयी विचारले असता त्यांनी त्यांची पाठराखण केली. ‘राम कदम यांनी जाहीर माफी मागितली आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला’, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, राम कदम कसे चांगले व्यक्ती आहेत हे सांगताना त्यांच्यावर स्तुतीसुमनं देखील उधळली!

‘मे २०१९पर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त’

दरम्यान, खड्ड्यांची पाहणी करताना ‘मे २०१९पर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील’, असं नवीन आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसेच अमर महल पूल ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात वापरासाठी खुला होईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हे एकदा बघाच! – राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य आणि सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -