घरमहाराष्ट्रहैदराबाद चकमक प्रकरण योग्य की अयोग्य? संमिश्र प्रतिक्रीया...

हैदराबाद चकमक प्रकरण योग्य की अयोग्य? संमिश्र प्रतिक्रीया…

Subscribe

हैदराबाद चकमकीच्या प्रकरणाबाबत अनेक लोकांनी भाष्य केलेलं आहे. सगळ्यांची विचारशैली वेगळी असल्यामुळे याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रीया आलेल्या आहेत.

हैदराबाद बलात्कार प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी चार मुख्य आरोपींना एन्काऊंटर केला. यामध्ये चारही आरोपींचा मृत्यू झाला. आरोपींना पोलीस तपासासाठी घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्र घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, ते हातात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्त पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. या घटनेवर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

‘चकमक करण्यची पध्दत चुकीची आहे’- अंजली दमानिया

- Advertisement -

‘जे काही झालं ते कायदेशीररित्या झालं पाहिजे होतं. ही चकमक करण्यची पध्दत चुकीची आहे.’ प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली.

‘हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घेतली पाहिजे’ -मायावती

- Advertisement -

‘युपी आणि दिल्लीच्या पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. दुर्दैवाने युपीमध्ये आरोपींना राज्याच्या अतिथीसारखं पाहुणचार केला जातो.’

‘ओरोपींवर अशीच कारवाई झाली पाहिजे’- नवनीत कौर राणा

‘मला चकमकीची ही घटना पटलेली आहे कारण हे झालं नसतं कर आरोपी अनेक वर्ष जेलमध्ये राहिले असते. निर्भयाचं नाव वेगळं होतं पण तिला हे नाव देण्यात आलं पण मला वाटतं नाव देण्याजागी ओरोपींवर अशी कारवाई झाली पाहिजे.’

‘अशा लोकांवर पोलिसांनी ऑन दि स्पोट कारवाई केली पाहिजे’ – बाबा रामदेव

‘अशा प्रकारचे जे आरोपी, गुन्हेगार किंवा दहशतवादी असतात त्यांच्यामुळे देश आणि धर्म संस्कृतीचं नाव खराब होतं अशा लोकांवर पोलिसांनी ऑन दि स्पोट कारवाई केली पाहिजे. ज्या प्रकरणात शंका जाणवते त्या प्रकरणांना कोर्टात नेलं पाहिजे.’

‘जे काही झालं ते फार भयानक आहे’ – मनेका गांधी

‘जे काही झालं ते फार भयानक आहे. आरोपींना तसंही फाशी झाली असती. कायद्याला आपल्या हातात कोणी घेऊ शकत नाही. बंदूकीनं उडवायचं होतं तर माग कायदा, कोर्ट, पोलीस या सगळ्यांचा काय फायदा?’

‘पोलीस पोलीसांसारखे वागलेले आहेत’- राज्यवर्धनसिंग राठोड

खासदार राज्यवर्धनसिंग राठोड यांनी ट्विट करून हैदराबाद पोलिसांना अभिनंदन केलं आहे. ‘पोलीस पोलीसांसारखे वागलेले आहेत असं म्हंटलं आहे. या देशात वाईटावर नेहमीच चांगली गोष्ट मात करणार हे पोलिसांनी दाखवलं आहे. पोलिसांनी स्वत:चं संरक्षण करीता गोळीबार केला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे’, असे ते म्हणाले.

 

‘हैदराबाद पोलीसांचं अभिनंदन!’- प्रणिती शिंदे

‘हैदराबाद पोलीसांचं अभिनंदन! आता पीडित मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. सरकारने आणि कोर्टाने हैदराबाद पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे. या प्रकरणामुळे इतर पोलिसांना देखील हिंमत मिळाली असावी. यामुळे महिला आणि मुलींना बळ मिळालं आहे, जी फार अभिमानाची गोष्ट आहे.’

‘हैदराबादमध्ये खरी शिवशाही’- प्रवीण तरडे

फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांनी प्रतिक्रीया दिली की, ‘हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला’ असं म्हणत पोलिसांचं कौतुक केलं आहे.

हैद्राबाद मधे खरी शिवशाही ..जागेवर फैसला..

Pravin Vitthal Tarde ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 5, 2019


हेही वाचाः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक गैरव्यवहार? ईडीने चौकशी करावी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -