घरमहाराष्ट्र५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं - रितेश देशमुख

५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं – रितेश देशमुख

Subscribe

मोदींची ५६ इंचची छाती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने त्याच ५६ इंचच्या छातीवरुन मोदींना टोला लगवला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने आता राजकारणाच्या रणधुमाळीत एंट्री मारली आहे. सोमवारी लातूर येथील काँगेर मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५६ इंचच्या छातीची चांगलीच खिल्ली उडवली आहे. ‘५६ इंचाची छाती म्हणजे नेमकी किती मोठी छाती असणार याचा मी विचार करत होतो. अहो पण ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं’, असं रितेश देशमुख म्हणाला आहे. याशिवाय देश चालवायला ५६ इंचची छाती नाही तर चांगलं मन लागतं, असा टोला रितेशने मोदींना लगावला.

- Advertisement -

‘काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिलं’

‘भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही काँग्रेसची देणगी आहे’, असे रितेश म्हणाला. त्याने या मेळाव्यात काँग्रेसने केलेल्या कामांची उजळणी केली. ‘देशातील नागरिकांजवळ असलेले मोबाईल, कम्प्युटर ज्यामुळे ते फेसबुक, ट्विटर वापरु शकतात. हे सर्व काँग्रेसने देशाला दिलं आहे. लातूरमध्ये मोबाईल सेवा साहेबांनी आणली’, असेदेखील रितेश म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -