घरमहाराष्ट्र‘आरजे’ करणार मतदार जागृती

‘आरजे’ करणार मतदार जागृती

Subscribe

आता मतदार जागृतीसाठी एफ.एमचा लाभ घेण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाकडून ठरवण्यात आले असून एफएमच्या रेडिओ जॉकींचे (आर.जे.) मतदार जागृतीसाठी सहाय्य घेण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण गाठण्यासाठी धावपळ करणारा चाकरमानी. महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी गडबडीत असणारा विद्यार्थी. छोटा मोठा व्यवसाय करणारा व्यावसायिक. असे कोणीही असो. मुंबईकरांना एफ.एम.रेडिओचे भलतेच वेड असते. सकाळी, संध्याकाळी लोकल किंवा बस प्रवासात अनेकांच्या कानात इअरफोन नक्कीच दिसतील. आता याच एफ.एम.चा लाभ मतदार जागृतीसाठी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने ठरविले असून एफएमच्या रेडिओ जॉकींचे (आर.जे.) मतदार जागृतीसाठी सहाय्य घेण्यात येणार आहे.

एफ.एम.वाहिन्यांच्या रेडिओ जॉकीची बैठक

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबईतील एफ.एम.वाहिन्यांच्या रेडिओ जॉकीची बैठक अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी घेतली आहे. यावेळी उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांच्यासह आकाशवाणी एफ.एम. गोल्ड, एफ.एम. रेनबो, रेडिओ मिर्ची, रेड एफएम, रेडिओ नशा, फीवर एफएम, मॅजीक एफएम, इश्क एफएम आदींचे आरजे यावेळी उपस्थित होते. मतदार नोंदणीसाठी पात्रांची अद्याप मतदार नोंदणी केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा व्यक्तिंनी मतदार नोंदणीसाठी कोणत्या संकेतस्थळाला भेट द्यायची? हेल्पलाईनचा कसा वापर करायचा?, मतदार नोंदणी, तपशीलात दुरुस्ती, पत्त्यात दुरुस्ती आदींसाठी कोणते अर्ज भरायचे, प्रत्यक्षरित्या कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी अर्ज भरायचा असल्यास काय कार्यपद्धती राहील? आदींबाबत शिंदे यांनी ‘आरजें’ च्या शंकांचे निरसन केले आहे. युवा मतदार आणि महिला मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी आरजेंनी एफ एम रेडिओवरुन वेळोवेळी आवाहन करावे आणि या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी शिंदे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  पत्रकार परिषद LIVE : शिवसेना-भाजप युतीची घोषणा, ५०-५० % जागांचा फॉर्म्युला

हेही वाचा – शिवसेना-भाजपचं अखेर ठरलं हो!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -