CoronaVirus:जिल्हाबंदीसाठी खोदला रस्ता; उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू

वेळेत उपचार न मिळाल्याने गावच्या रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Mumbai
जिल्हाबंदीसाठी खोदला रस्ता; उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू

संपूर्ण राज्यासह देशभरात करोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आपापल्या गावच्या सीमा बाहेरील माणसांकरता बंद करण्याचा आदेश दिला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात सीमा बंद करताना गावकऱ्यांनी चक्क रस्ता खोदून गावच्या सीमा बंद केल्या आहेत. हा रस्ता खोदलेला असल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने गावच्या रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

असा घडला प्रकार

सोलापूर आणि पुणे जिल्ह्याची सीमा असलेला कोंढारचिंचोली येथील पुलाजवळ जेसीबीच्या सहाय्याने जिल्ह्याच्या सीमा बंद करताना चक्क रस्ता खोदण्यात आला आहे. हाच रस्ता पुढे थेट पुण्यातील भिगवणला जातो. कोंढारचिंचोली येथे राहणारे शिवाजी डफळे या वृद्धाला हृद्यविकाराचा झटका आल्याने या व्यक्तीला उपचाराकरता भिगवणला घेऊन जायचे होते. मात्र तेथे जाण्याचा रस्ता पुर्णपणे खोदलेल्या असल्याने गाडी पुलावरून नेणे शक्य नसल्याने उपचाराअभावी रूग्णाला आपला जीव गमवावा लागला.

करण्यात आलेल्या जिल्हाबंदीसाठी बेकायदेशीररित्या अशा सीमा खोदण्याच्या प्रकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here