घरCORONA UPDATEकोरोना रोखण्यासाठी आरएसपी शिक्षक करताय पोलीस-वाहतूक खात्याला मदत

कोरोना रोखण्यासाठी आरएसपी शिक्षक करताय पोलीस-वाहतूक खात्याला मदत

Subscribe

करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे, त्यामुळे पोलीस व वाहतूक पोलिसांवरील जबाबदारी वाढली असून त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. हा भार कमी करण्यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्याना रोड सेफ्टी पेट्रोल (आरएसपी) रस्ते सुरक्षेचे धडे देणारे शिक्षक पुढे सरसावले आहेत. कल्याणमध्ये राहायला असलेले पण नोकरीसाठी मुंबई आणि ठाण्यात कार्यरत असलेले हे शिक्षक २२ मार्चपासून पोलिसांना सहकार्य करत आहेत. यामध्ये ते संचारबंदीच्या दरम्यान विनाकारण फिरणाऱ्याला हटकणे, आरोग्य सेवा देण्याऱ्या पथकाला मदत करणे, विविध चौकांमध्ये गस्त घालत असून लोकांचे समुदेशन करणे अशी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.

कल्याण डोंबिवलीचे समादेशक मनिलाल शिंपी, महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मंडळाचे माजी सदस्य व आरएसपी अधिकारी अनिल बोरनारे, महादेव क्षीरसागर, अनंत किनगे, बन्सीलाल महाजन, आर आर भोकनल, केशव मालुंजकर, सचिन मालपुरे, दत्ताराम पाटील, योगेश अहिरे, कैलास पाटील व रितेश पाटील हे सर्व शिक्षक कल्याणमधील स्टेशन परिसर, शिवाजी चौक, सहजानंद चौक, वायले नगर, खडकपाडा, आधारवाडी, भापगाव रस्ता, यासह अनेक विभागात पोलिस अधिकाऱ्यांना मदत करत आहेत.

- Advertisement -

हे सर्व शाळांमध्ये आरएसपी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे हे युनिट आहे. वाहतुकीचे व रहदारीच्या नियमांबाबत मार्गदर्शन करणे, देशात महापूर, भुकुंप व कोरोना व्हायरस सारखी आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास प्रशासनाला मदत करणे अपेक्षित असते. त्यामुळे आम्ही पोलिसांच्या मदतीला जाण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला. आमच्या या मदतीमुळे प्रशासनाला मोठी मदत मिळत असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मंडळाचे माजी सदस्य व आरएसपी अधिकारी अनिल बोरनारे यांनी समाधान व्यक्त केले.

शिक्षकांचे होतेय कौतुक

शिक्षकांच्या या सहकार्यामुळे कल्याणमधील सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी संस्था व पोलीस-ट्रॅफिक-महानगरपालिका अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -