घरमहाराष्ट्रभाजपने छत्रपती उपाधीचा तरी मान ठेवायचा होता - रोहित पवार

भाजपने छत्रपती उपाधीचा तरी मान ठेवायचा होता – रोहित पवार

Subscribe

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षांतरानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि युवा नेता रोहित पवार यांनीदेखील त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत छत्रपती उपधीचा मान राज्यातील सर्व नागरिकांनी ठेवला आहे, तो तुम्हीही ठेवावा, असे भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

वाचा काय म्हणाले रोहित पवार –

छत्रपती या उपाधीवर संपुर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही तर ती उपाधी मला महत्वाची वाटते.
अशा वेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याच सांगण्यात येत, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायच आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे.
कोणतही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो तसाच आपणही तो मान ठेवावा.

- Advertisement -

उदयनराजे भोसले यांनी केला भाजपात प्रवेश 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन काल, शनिवारी भाजपात प्रवेश केला. नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित त्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. भाजप पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसणीनुसार काम करत असल्यामुळे आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे उदयनराजे यावेळी म्हणाले. तर, देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश केल्याने आपल्याला आनंद झाल्याचे अमित शहा म्हणाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर शरीरात चैतन्य आणि ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या घराण्याचे नाव रोशन करणारे उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने आपल्याला आनंद झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -