घरमहाराष्ट्ररा. स्व. संघ हिंदूंसाठी नव्हे - संजय सोनवणी

रा. स्व. संघ हिंदूंसाठी नव्हे – संजय सोनवणी

Subscribe

पुणे :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदु धर्माचे नव्हे तर वैदिक धर्माचे प्रतिनिधित्व करतो. पुरुषप्रधान जन्माधारित विषमतेच्या वैदिक तत्वज्ञानाचा पुरस्कार संघ करत आला आहे. राजसत्तेवर धर्मसत्तेचे वर्चस्व असले पाहिजे हा संघ-तत्वज्ञानाचा गाभा राहिलेला आहे. संघाचा राष्ट्रवाद हा हिंदु नसून वैदिक राष्ट्रवाद आहे. हिंदुंचा धार्मिक व सांस्कृतीक इतिहास हा सर्वस्वी वेगळा राहिलेला असुन त्याचा वैदिक धर्माशी काहीही संबंध नाही. हिंदुंचा कधी ढाल तर कधी शस्त्र म्हणून वापर करत संघाने वैदिकत्व जपले आहे. हिंदुंनी संघापासुन सावध रहायला हवे असे मत इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले. ते आदिम हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या “आरएसएसचा वैदिकवाद- हिंदू एकत्रीकरणातील मुख्य अडसर” या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

ब्रिटिशकालात वैदिक आणि हिंदु या दोन धर्मांना एकच समजण्याची गफलत झाल्याचा गैरफायदा संघाने उचलला. आर्य सिद्धांताला वैदिकांनी उचलुन धरले. रामालाही त्यांनी आर्य मानत तो दक्षीण भारतावरचा पहिला आक्रमक व वैदिक संस्कृती तेथे नेणारा म्हणून संघाने रामाला उचलुन धरले व राम मंदिराचा चर्चेने सुटु शकणारा विषय उग्र करत देशात हिंसाचाराला निमंत्रण दिले. संघप्रणित सरकार ्सत्तेत आल्यापासुन वैदिक संस्कृतीचे महात्म्य व सिंधु संस्कृती वैदिक आर्यांचीच निर्मिती आहे असे ठसवण्याचे शासकीय पातळीवर जोमाने प्रयत्न सुरु झाले. हिंदुंचा आर्थिक, सामाजिक व राजकीय इतिहास संघाच्या दृष्टीने बिनमह्त्वाचा ठरला. लोहार, वडार, सुतारांसारख्या अनेक व्यावसायिक हिंदू जातींनी साधलेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल मात्र मुग गिळून बसले. प्रत्यक्षात “वैदिकत्व” जपत “हिंदुत्व” हे नाव स्वार्थासाठी त्यांनी वापरले असेही सोनवणी म्हणाले.

- Advertisement -

वैदिक धर्मियांनी आपली पाळेमुळे शोधण्यासाठी गेली दिडशे वर्ष आटापिटा चालवला आहे. हिंदुंना संघाच्या वैदिकत्वापासुन फारकत घेत आपला राजकीय, सामाजिक व आर्थिक इतिहास स्वतंत्रपणे शोधला पाहिजे, अन्यथा वैदिकांचे फुट सोल्जर अशीच त्यांची ओळख राहील आणि न्युनगंडातच जगावे लागेल असेही सोनवणी अनेक मुद्यांना हात घालत म्हणाले. सतीश पानपत्ते यांनी प्रास्ताविकात आदिम हिंदु महासंघाच्या स्थापनेमागील कालसुसंगत हिंदुहितवादी भुमिका स्पष्ट केली आणि हिंदुंना आत्मभान देण्यासाठी या संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -