घरमहाराष्ट्रआरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याच्या सोशल मीडियावर अफवा

आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याच्या सोशल मीडियावर अफवा

Subscribe

शिक्षण विभागाकडून खुलासा

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत 25 टक्के आरक्षणांतर्गत राबवण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. सोशल मीडियावर प्रवेश परीक्षा सुरू झाल्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात फिरत असलेले संदेश हे खोटे असल्याचा खुलासा मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या पालकांनी या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

आरटीई कायद्यांतर्गत दारिद्य्र रेषेखालील विद्यार्थ्यांचा खासगी शाळांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होते. त्यामुळे या आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट अनेक पालके आतुरतेने पाहत असतात. साधारणपणे फेब्रुवारी-मार्चमध्ये आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचे मेसेज व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. त्यामुळे अनेक पालकांकडून शाळांमध्ये यासंदर्भात विचारणा करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

परंतु आरटीई प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून, यासंदर्भातील निर्णय व तपशील हा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येत असून, अद्याप कोणताही तपशील राज्य सरकारकडून आला नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेले मेसेज हे खोटे असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात यावे असेही आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -