घरमहाराष्ट्रपुणे : आता हेल्मेटसक्तीसाठी आरटीओ करणार कारवाई

पुणे : आता हेल्मेटसक्तीसाठी आरटीओ करणार कारवाई

Subscribe

पुणे पोलिसांच्या निर्णयापाठोपाठच प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई पुण्यात येत्या सोमवारपासून सुरु केली जाणार आहे.

गेल्या आठवड्यातच पुणे पोलिसांनी हेल्मेटसक्तीच्या निर्णयावर अंमलबजावणी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. ही अंमलबजावणी १ जानेवारीपासून केली जाणार आहे. पोलिसांच्या या निर्णयावर पुण्याच्या काही लोकांकडून टीकेचे सूर उमटताना दिसत आहेत. परंतु, आता पोलिसांच्या या निर्णयापाठोपाठच प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई पुण्यात येत्या सोमवारपासून सुरु केली जाणार आहे. त्याचबरोबर ही कारवाई फक्त दंडात्मक नसून यात वाहन चालकाचे परवानेही रद्द करण्यात येणार आहे. आरटीओ कारवाईसाठी वाहतूक पोलिसांची मदत घेणार असल्याची माहिती आरटीओ अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली आहे.

हेही वाचा – आता पुणेकरांना हेल्मेट घालावेच लागणार!

- Advertisement -

सचिवांनी दिले आहेत आदेश

राज्याचे मुख्य सचिवांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रस्ते सुरक्षा समितीने दिलेल्या सुचनांवर केलेल्या कारवाईंचा आढावा घेतला. या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, वाहतूक पोलीस उपायुक्त, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता उपस्थित होते. या बैठकीत सचिवांनी हेल्मेटसक्ती सोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – पुण्याचे सिंघम पोलीस आणि वाहतूक कोंडीवर जालीम उपाय!

- Advertisement -

नियमभंगाविरोधात अशी होईल कारवाई

पुण्यात आता हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधात फक्त दंडात्मक कारवाई होणार नाही तर त्यांचे वाहतूक परवाना देखील निलंबित होणार आहे. या कारवाईत वाहनचालकांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाला आपला परवाना परत मिळवण्यासाठी दोन तास रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुपदेशासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.


हेही वाचा – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -