घरमहाराष्ट्रइगतपुरी स्‍थानकात रूळाला तडे; राज्यराणी एक्सप्रेसचा खोळंबा

इगतपुरी स्‍थानकात रूळाला तडे; राज्यराणी एक्सप्रेसचा खोळंबा

Subscribe

इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी फलाट क्रमांक ३ वरील रुळाला तडा गेल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती.

इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ आज, मंगळवारी सकाळी फलाट क्रमांक ३ वरील रुळाला तडा गेल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीला दोन ते अडीच तास लागणार असल्याने वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. एक्स्प्रेस उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकावर सकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास मनमाडहून मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस प्लॅटफार्म नंबर तीनवर आली असता, रेल्वे रुळाला तडा गेला. ही बाब रेल्वे कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच मुंबईकडे जाणारी मनमाड – मुंबई पंचवटी एक्स्प्रेस व इतर एक्स्प्रेस प्लॅटफार्म नंबर चार वरुन वळविण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२५९८ गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा एक डबा कसारा ते इगतपुरी दरम्यान घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत कुणीही जखमी झाले नसून या एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरुप बाहेर पडले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -