घरमहाराष्ट्रसामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

Subscribe

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीकेचे बाण चालवले गेले आहेत.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीकेचे बाण चालवले गेले आहेत. आजच्या सामना संपादकीयमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूर दौरा आणि त्या दरम्यान नवी मुंबईमध्ये तीन सफाई कामगारांचा मॅनहोलमध्ये गुदमरून झालेला मृत्यू यावरून मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात कामगार क्षेत्र मोडीत निघाले अशी देखील टीका करण्यात आली आहे. तसेच, गरीब, मजुरांना, कामगार वर्गाला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले गेले. पण, प्रत्यक्षात मात्र स्वप्न काही साकार झाले नाही अशी टीका देखील यावेळी सामनातून करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे ‘सामना’मध्ये?

पंतप्रधान मोदी सोलापुरात प्रचाराचा धुरळा उडवत असताना नवी मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला. एका बाजुला आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना आरक्षण दिल्याचा आनंद साजरा केला जात आहे. दलित, शोषितांचे एकमेव तारणहार फक्त आपणच आहोत, असा डांगोरा पिटला जात आहे. राज्यांमध्ये जाऊन योजनांच्या घोषणा होत आहेत आणि दुसरीकडे गरीब मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरावे लागत आहे आणि त्यात गुदमरून जीव गमवावा लागत आहे. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

- Advertisement -

कुठे शिक्षणमंत्र्यासमोर विद्यार्थ्यांना बदडून काढले जाते. हे सत्य भीषण आहेच, पण घरची चूल पेटवण्यासाठी नाल्यात, गटारांच्या मॅनहोलमध्ये जेव्हा गरीब मजुर उतरतो व मरण पावतो तेव्हा मन जास्त अस्वस्थ होते. तसेच आत्तापर्यंत मरण पावलेल्या किती कामगारांना नुकसान भरपाई दिली? असा सवाल देखील यावेळी सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मोदींच्या काळात कामगार क्षेत्र मोडीत निघाले, अशी देखील टीका करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी शे – पाचशे कोटी रूपये खर्च करतात मात्र हेच पैसे कामगारांच्या कल्याणासाठी वापरण्यात आले असते तर बरे झाले, असते असा चिमटा देखील सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना काढला गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -