घरमहाराष्ट्ररेल्वे मार्ग होणार सुरक्षित; अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ मदत

रेल्वे मार्ग होणार सुरक्षित; अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ मदत

Subscribe

लोकल अपघातात सर्वाधिक मृत्यू धावत्या लोकलमधून पडून होतो. त्यामुळे या प्रकारांच्या अपघातांना आळा बसण्यासाठी आणि तसेच धावत्या लोकलवर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन रेल्वे रुळाशेजारी आणि रेल्वे फाटकाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणे शक्य होणार आहे. याची सुरुवातही झाली असून पहिला टप्पा हा कळवा ते मुंब्रा दरम्यान सुरू झाला आहे.

मध्य रेल्वेवर वाढत्या प्रवासी संख्येबरोबर लोकल अपघातामध्ये वाढ होत आहे. हे लोकलचे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून वारंवार उपाययोजना करण्यात येतात. त्याच्याच एक भाग म्हणून रेल्वे रुळाशेजारी हायटेक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येत आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून रेल्वे सुरक्षा दलाने कळवा ते मुंब्रा दरम्यान रेल्वे रुळाच्या शेजारी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. कळवा फाटकाजवळच हे कॅमेरे पूर्व व पश्चिम बाजुने बसवण्यात आले असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

मध्य रेल्वेवरील पिक-अवरच्यावेळी मुंब्रा ते कळवा दरम्यान एक किमीच्या अंतरावर आतापर्यंत किमान दहा अपघातांची नोंद झाली आहे. मध्य रेल्वेवर 2019 मध्ये लोकलमधून पडून होणार्‍या अपघातात 611 जणांचा मृत्यू झाला आहे. कुर्ला लोहमार्ग पोलीस हद्दीत 73, डोंबिवली 44 आणि ठाणे लोहमार्ग पोलीस हद्दीत 45 जणांच्या मृत्यूंची नोंद आहे. तर वाशी हद्दीतही 64 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. तसेच इतरही रेल्वे रुळाचा परिसराचा अभ्यास करुन सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.

सीसीटीव्हीचा असा होणार फायदा
लोकलमधून पडणार्‍या प्रवाशांचा अपघात झाल्यास सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन हा कॅमेरा नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर अपघात दिसताच तात्काळ मदतही पोहोचवणे शक्य होणार आहे. अपघात कॅमेर्‍यात कैद होणार असल्याने त्याचे नेमके कारणही समजण्यास मदत होईल. त्यानुसार रेल्वेला उपाययोजना करणे शक्य होणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के के अशरफ यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -