घरCORONA UPDATECoronavirus : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची OLX वर विक्री!

Coronavirus : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची OLX वर विक्री!

Subscribe

कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीकरता त्याने 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च OLX वर विकण्यास काढले आहे.

गुजरातमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा होय. सरदार वल्लभभाई पटेल ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ यांचा जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ नावाने ओळखला जातो. जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण जगच कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. देशात कोरोना निधी करता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मागणी करत आहे. अशावेळी गुजरातच्या एका महाभाग व्यक्तीने यामध्ये नामी शक्कल लढवली. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी करता त्याने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च OLX वर विकण्यास काढले आहे.

२०१८ मध्ये उभारण्यात आलेल्या या पुतळ्याला तब्बल २९८९ कोटींचा खर्च झाला. या खर्चामुळे मोदी सरकारवर टीका झाली होती. आता हा पुतळा एक नव्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ३०,००० कोटींची बोली हा महत्त्वकांक्षी प्रकल्प विक्रीसाठी काढला आहे. या बातमीने सगळ्यांना धक्का बसला आहे. सध्या देशात रुग्णालय आणि हेल्थकेअर इक्विपमेंटसाठी पैशाची गरज असल्याने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकण्याची गरज आली आहे. अशी जाहिरात देण्यात आली होती. OLX ने मात्र ही जाहिरात तात्काळ हटवली आहे. परंतु सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -