घरमहाराष्ट्रवर्दीला सलाम! अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसाने केला रस्ता साफ

वर्दीला सलाम! अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसाने केला रस्ता साफ

Subscribe

वाहतूक पोलिस रजिया फैयाज सय्यद यांनी दिले कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण

वाहतूक पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्यामुळे कोरोना संकटातही कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावणारे राज्यातील पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. वर्दीत असताना आपले कर्तव्य स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रात्रंदिवस करत असतात. याच कर्तव्याचा एक आगळावेगळा प्रत्यय पुण्यातील रस्त्यावर पाहायला मिळाला. पुणे शहरातील नेहमी गजबजलेला रस्ता म्हणून प्रसिद्ध असणारा टिळक रस्ता.  त्यामुळे या रस्तावर अपघात, वाहकुत कोंडी हे नेहमीचे झाले आहे. दरम्यान टिळक रस्त्यावर सोमवारी सायंकाळी एस.पी. कॉलेज चौकात रिक्षा आणि बाईकचा अपघात झाला. या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. परंतु रिक्षा आणि बाईकच्या काचांचे यात नुकसान झाले होते. त्यामुळे रस्त्यावर काचांचे तुकडे पडले होते.

यावेळी खडक वाहतूक विभागात ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलिस रजिया फैयाज सय्यद यांनी कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण साऱ्यांनाच पटवून दिले.वाहतूक पोलिस रजिया यांनी या काचांमुळे अपघात घडून कोणाला इजा होऊ नये या भावनेने स्वत; हातात झाडू घेऊन रस्तावरील काचा बाजूला केला. महिला पोलिसाच्या या कर्तव्यदक्षतेचे आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. काचा वेळीच उचल्याने इतर अपघात घडण्यापासून रोखता आले. त्यामुळे पोलिस रजिया यांच्यावर चौकातून ये जा करणाऱ्या नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -