घरमहाराष्ट्रसंत ज्ञानोबांच्या पालखीसमोर चालण्यास; भिडेगुरूजी, शिवप्रतिष्ठनला मज्जाव

संत ज्ञानोबांच्या पालखीसमोर चालण्यास; भिडेगुरूजी, शिवप्रतिष्ठनला मज्जाव

Subscribe

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख्यांनी पोलिसांना याबाबत पत्र लिहले होते.

संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी मागितली होती. परंतु पालखी सोहळा समितीने यांची ही मागणी नाकारली आहे. पालखी समोर दिंड्याचा क्रम असतो. हा क्रम परंपरागत चालत आला आहे. तो कायम राहिला पाहीजे, असे मत पालखी प्रामुख्यांनी मांडले आहे. पालखी सोहळा समितीने पुण्यातील पोलिसांना पत्र दिले होते. या पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात केली होती.

नेहमीप्रमाणे या वर्षीही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. तसेच या पालखीसमोर दिंड्याचा क्रम असतो. परंतु संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पालखीच्या समोर चालण्याची परवानगी मागतली होती. मात्र ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख्यांनी या मागणीला साफ विरोध दर्शवला आहे. जर समितीने संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांना पालखीसमोर चालण्याची परवानगी दिली तर, दिंड्याच्या कार्यक्रमात अडथळा येईल. दिंड्याचा क्रम कायम राहावा, म्हणून ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख्यांनी पुणेयेथील पोलिसांना पत्र लिहले आहे. त्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही हे स्पष्ट केले आहे. मात्र समोरून चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखीच्या पाठीमागून चालू शकतात, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे उद्या संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमणार आहेत. सर्व पालख्या पुढे गेल्यावर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -