घरमहाराष्ट्रपुणे नाही जिजापूर म्हणा - संभाजी ब्रिगेड

पुणे नाही जिजापूर म्हणा – संभाजी ब्रिगेड

Subscribe

पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर आता पुणे जिल्ह्याचेही नामांतर करावे, अशी मागणी आता संभाजी ब्रिगेडने पुढे केली आहे.

नामांतराचा संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही. देशभरात जिल्ह्यांच्या नामांतराची घाई सुरु असली तरी महाराष्ट्रात नामांतराची लढाई खुप आधीपासून सुरु आहे. त्यातच शिवेसनेने औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची मागणी पुढे रेटली आहे. आता संभाजी ब्रिगेडनेही आपली जुनी मागणी पुन्हा एकदा उपस्थित करत पुणे जिल्ह्याचे नाव जिजापूर करण्यात यावे, असा प्रस्ताव सरकारला देणार असल्याचे म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष शिंदे हे आज पुणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबतचे निवेदन देणार असल्याचे कळते. पुण्यातच शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. इथेच मा जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला होता. भावी पिढीला शिवाजी महाराजांचा उज्ज्वल इतिहास कळावा, या हेतूसाठी सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसोबत पुण्याचेही नामांतर करावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

- Advertisement -

पुणे आणि नामांतर वाद जुनाच

आघाडी सरकारच्या काळात पुणे विद्यापीठाचे नाव बदलण्यावरुन बराच गजहब झाला होता. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी पुणे विद्यापीठाचे नामांतर सावित्रीबाई फुले असे करावे, अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर एकदा कॅबिनेट बैठकीतच त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यावरून खडेबोल सुनावले होते. शेवटी पुणे विद्यापीठाचा “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ” असा नामविस्तार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -