घरमहाराष्ट्र'जिहादी आतंकवाद, नक्षलवाद कोणत्या ग्रंथाच्याआधारे ते ‘एसआयटी’ सांगेल का?'

‘जिहादी आतंकवाद, नक्षलवाद कोणत्या ग्रंथाच्याआधारे ते ‘एसआयटी’ सांगेल का?’

Subscribe

अटक झालेले कार्यकर्ते विविध संघटनांचे असले तरी हिंदू धर्माचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेलाच लक्ष्य करण्याचे प्रयत्न स्पष्ट दिसत आहेत, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हटले आहेत.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या १८ कार्यकर्त्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केल्याविषयी एक आरोपपत्र कर्नाटकच्या ‘विशेष अन्वेषण पथका’ने (एस्.आय.टी.ने) प्रसिद्ध केले आहे. या आरोपपत्रात हिंदू आतंकवादाच्या जुन्या राक्षसाला पुन्हा बाहेर काढण्याचे प्रयत्न दिसत असून काँग्रेस आणि सेक्युलरवाद्यांचे ‘मालेगाव-१’ फसले, तर आता ‘मालेगाव-२’ चालू करण्याचे षडयंत्र दिसत आहे. यात अटक झालेले कार्यकर्ते विविध संघटनांचे असले तरी हिंदू धर्माचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेलाच लक्ष्य करण्याचे प्रयत्न स्पष्ट दिसत आहेत, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हटले आहेत. बंगळुरू येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनीही परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते मोहन गौडा आणि समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा ही उपस्थित होते.

हेही वाचा – सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? : अशोक चव्हाण

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले चेतन राजहंस?

चेतन राजहंस म्हणाले की, अटक झालेल्या आरोपींनी या ग्रंथातून म्हणे प्रेरणा घेतली. ‘सनातन संस्थेचा एखादा ग्रंथ वाचून गौरी लंकेश यांची हत्या केली’, असा हास्यास्पद दावा करणारी सीबीआय आणि कर्नाटक एस्.आय.टी. ‘सहस्रो निरपराध्यांची हत्या करणारे नक्षलवादी कोणता ग्रंथ वाचून या हत्या करतात किंवा लाखो हत्या करणारे आणि जगभरात आतंकवाद पसवणारे जिहादी कोणता ग्रंथ वाचून ही कृत्ये करतात?, तसेच कर्नाटकात २३ हिंदूत्ववाद्यांच्या हत्या झाल्या, त्यापैकी अनेक हत्या करणारे पॉप्युलर फ्रंटचे कार्यकर्ते ते कोणता ग्रंथ वाचतात’, हे सांगण्याचे धैर्य दाखवतील का?, असा परखड प्रश्‍न सनातन संस्थेचे राष्ट्रीय चेतन राजहंस यांनी केला. चेतन राजहंस पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने के.ए. अब्बास विरूद्ध याचिकेच्या वेळी प्रिंट मीडीयापेक्षा मोशन फिल्म हे माध्यम अधिक परिणामकारक असते, असे म्हटले होते. असे असताना देखील हिंसा दाखवणारे ‘क्राइम पेट्रोल’सारखे वाहिन्यांवरील कार्यक्रम, बलात्कार आणि खून यांचा भरणा असलेले चित्रपट यांमुळे गुन्हे घडतात, असे कधी कोणी म्हटल्याचे आढळले नाही. ते त्यांचे ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आहे, असे सांगितले जाते. मग सनातन संस्थेने १५ वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या आणि गेली काही वर्षे मागणीअभावी न छापलेला ग्रंथ वाचून हत्या झाली, असा निष्कर्ष काढणे, यातून तपासयंत्रणा सनातनला गोवण्यासाठी काय काय करू शकतात, याची कल्पना येते, असे देखील ते म्हणाले.


हेही वाचा – ते संशयित अतिरेकी आमचे सदस्य नाहीत; सनातनचे घुमजाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -