राँग साईडने आलेला टेम्पो ठरला ‘काळ’!

Sangali
sangali : tempo came from wrong side killed a man
प्रातिनिधिक फोटो
सांगली शहरातील एसटी स्टँडजवळ गुरुवारी रात्री एक विचित्र अपघात घडला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास स्टँड परिसरात एक टेम्पो भरधाव वेगात आणि तोही चुकीच्या दिशेने आला. यावेळी रस्ता ओलांडून जाणाऱ्या एका व्यक्तीला या टेम्पोने जोरदार धडक दिली. टेम्पोचा वेग नियंत्रणाबाहेर असल्यामुळे त्या पादचाऱ्याला टेम्पोची जोरदार धडक बसली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,

टेम्पो चालकाची कबुली…

मंगेश गुरुवारी रात्री रिक्षा स्टँडवरून शिवाजी पुतळा परिसराकडे निघाले होते. यावेळी चुकीच्या दिशेने येत असलेल्या एका वेगवान टेम्पोची त्यांना धडक बसली. या अपघातात मंगेश टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडले आणि जागीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातानंतर टेम्पो चालकाने काही अंतरावर जाऊन गाडी थांबवली आणि स्वत: शहर पोलीस ठाण्यात जाऊन सविस्तर प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेची माहिती मिळाल्यावर सांगली शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर संपूर्ण घटनेचा पंचनामा करुन मंगेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, सध्या कबुली देणाऱ्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, अपघात नक्की कसा झाला? यासंदर्भात पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या अपघातामुळे मंगेश यांच्या परिवाराला खूप मोठा धक्का बसला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here