घरताज्या घडामोडी'उदयनराजेंनी असं केलं काय?' संजय काकडेंचा सवाल

‘उदयनराजेंनी असं केलं काय?’ संजय काकडेंचा सवाल

Subscribe

उदयनराजे भोसलेंना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाल्यानंतर आता संजय काकडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत खासदार होऊन देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला. तेव्हापासून काहीसे प्रकाशझोतापासून लांब गेलेले उदयनराजे भोसले आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार असलेल्या संजय काकडेंनी उदयनराजेंवर थेट निशाणा साधला आहे. ‘उदयनराजेंनी पक्षासाठी केलेलं योगदान काय आहे? ते पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यांच्या बाजूचा आमदार निवडून आणल्यामुळे त्यांचा भाव वाढला, पण त्यापलीकडचा आमदार त्यांना निवडून आणता आला नाही’, असं संजय काकडे म्हणाले आहेत. राज्यसभेतील ७ जागा लवकरच रिक्त होत असून त्यामध्ये खुद्द संजय काकडेंची एक जागा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपकडून राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचं संजय काकडेंनी म्हटलं आहे.

उदयनराजे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत

राज्यसभेमध्ये गणिताच्या आधारावर भाजपकडून दोन जागा हमखास निवडून येऊ शकतात. त्यापैकी एक जागा रिपाइंचे रामदास आठवले यांना द्यावी लागणार आहे. ते केंद्रात मंत्री असल्यामुळे ती जागा रामदास आठवलेंच्या पदरात पडणार आहे. मात्र, दुसऱ्या जागेसाठी संजय काकडेंसमोर उदयनराजे भोसलेंचं आव्हान असणार आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपची कास धरणारे उदयनराजे पोटनिवडणुकीतील पराभवापासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांनाच भाजपकडून राज्यसभेवर पाठवलं जाईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय काकडेंनी खास पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंवर टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संजय काकडे?

यावेळी बोलताना संजय काकडे म्हणाले, ‘पक्षात येऊन उदयनराजे पडले. त्यांचं योगदान काय आहे पक्षासाठी? त्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत पक्षाकडून इतक्या घाईत निर्णय घेतला जाईल असं मला वाटत नाही. मी स्वत: फडणवीसांना माझ्या उमेदवारीबद्दल वरिष्ठांशी बोलायला सांगितलं आहे. पक्षाचा सहयोगी सदस्य म्हणून मी जी कामगिरी केली आहे, त्या आधारावर भाजप १०० टक्के माझी निवड करेल, अशी मला खात्री आहे’, असं संजय काकडे यावेळी म्हणाले. शिवाय, ‘मला सहयोगी सदस्य म्हणून नाही तर भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे’, असं देखील संजय काकडेंनी यावेळी नमूद केलं.


हेही वाचा – उदयनराजेंसाठी रामदास आठवलेंच्या खासदारकीवर संकट?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -