सेना-भाजपाची युती ‘संधीसाधू’ – संजय निरुपम

'शिवसेनेने गेली चार वर्षे भाजपला शिव्या दिल्या. चौकीदार चोर आहे असे उद्गारही काढले. मग आता झालेली युती ही 'चोर चोर मौसेरे भाई' अशी आहे का?' असा सवाल संजय निरुपम यांनी विचारला आहे.

Mumbai
Sanjay Nirupam criticised sena-bjp allaince
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम (फाईल फोटो)

‘चौकीदार चोर आहे तर शिवसेनेला पुन्हा चोर असलेला चौकीदार सत्तेमध्ये पाहिजे आहे काय?’, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपमांनी उपस्थित केला आहे. ‘चौकीदार चोर आहे असे म्हणणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली. सत्तेसाठी भाजपसमोर गुडघे टेकले’, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली आहे. शिवसेना व भाजपा युतीवर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम म्हणाले की, ‘शिवसेना – भाजपा युती ही स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी झालेली आहे. ही संधीसाधू युती आहे. शिवसेनेने भाजपसमोर गुडघे टेकलेले आहेत. सत्तेसाठी शिवसेना लाचार झालेली आहे. शिवसेनेने गेली चार वर्षे भाजपला शिव्या दिल्या. चौकीदार चोर आहे असे उद्गारही काढले. मग आता झालेली युती ही ‘चोर चोर मौसेरे भाई?’ अशी आहे का?’ असा माझा त्यांना सवाल आहे अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली आहे.

युतीबाबत प्रतिक्रिया देताना निरुपम म्हणाले की, ‘सामना पेपरमधून शिवसेनेने कायम भाजपवर खालच्या पातळीवर जावून टीका केलेली आहे. शिवसेनेने भाजपला औरंगजेब आणि अफजल खान म्हणूनदेखील हिणवले होते. मग, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यातील स्वबळाचा नारा आत्ता कुठे गेला?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विरोधकांची टीकास्त्रं

दरम्यान, शिवसेना-भाजपाच्या युतीची घोषणा होताच काही विरोधकांनी दोन्ही पक्षांवर टीकास्त्रं डागलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी या युतीबाबत ट्वीटरवरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली?अयोध्येत राम मंदिरही बनवून झाले? नाणारही बुडवला? उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाकला धडाही शिकवून झाला? इतकेच काय तर पहारेकरी आता नीट ड्युटी करू लागला आहे? ‘तेरे मेरे सपने मिले’ मग युती होणे स्वाभाविकच आहे नाही का?” असा खोचक सवाल मुंडेंनी ट्वीट करुन विचारला आहे.

तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही चारोळीच्या माध्यमातून ‘युती’वर टीका केली आहे. ‘ती पाहताच कमळा
विसरलो आम्ही स्वबळा. गडया खुर्ची टिकवण्या.. तुझ्या गळा माझ्या गळा..’ अशी चारोळी रचत राष्ट्रवादीने युतीवर तोफ डागली आहे. याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटील यांनीही ‘युती’वरुन भाजपा आणि शिवसेनेवर तोफ डागली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here