घरमहाराष्ट्रमुंबईत बोगस मतदारांचा सुळसुळाट - संजय निरूपम

मुंबईत बोगस मतदारांचा सुळसुळाट – संजय निरूपम

Subscribe

मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदार संघात १५ ते २० हजार बोगस मतदार आणि लोकसभा क्षेत्रात १ लाख आणि त्याहून अधिक बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना आता आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. मात्र निवडणुकीआधीच काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी एक गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदार संघात १५ ते २० हजार बोगस मतदार आणि लोकसभा क्षेत्रात १ लाख आणि त्याहून अधिक बोगस मतदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नवीन मतदारांची यादीचे काम सुरू असतानाचा हा सर्व प्रकार बाहेर आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बोगस मतदारांचा वापर होऊ शकतो असे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

एकाच फोटोचे ११ मतदार

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एकाच फोटोच्या नावावर ११ मतदार आणि त्या नावाची नोंद आणि मतदार कार्ड तयार करण्यात आल्याचे देखील समोर आल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे एवढंच नाही तर नावासह पत्तेही बोगस असल्याचे समोर आल्याचे निरुपम म्हणाले आहेत. एका ठिकाणी शर्मा संतोषी असे नाव तर दुसरीकडे तेच नाव बारोटे, सावंत, पांडे, दुबे, आदी नावाने देण्यात आल्याचे सांगत केवळ बूथ बदलून नावे आणि मतदार ओळखपत्र तयार करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

- Advertisement -

या ठिकाणी बोगस मतदार

हे बोगस मतदार आणि त्यांच्या याद्या या मुंबईतील मागाठाणे, दिंडोशी, शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द, चांदीवली आदी ठिकाणी समोर आल्याची माहिती एकलव्य नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून समोर आली असून, ती नितीन शिंगाटे यांनी बाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यामध्ये अधिकाऱ्यांचा हात

मुंबईमध्ये बोगस मतदार ओळखपत्र बनविण्याचे मोठे रॅकेट असून, यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप निरुपम यांनी करत अधिकारी पैसे घेऊन अशा बोगस याद्या तयार करत असल्याचे सांगत हे प्रकार तात्काळ थांबवावे असे सांगत ३१ तारखेला नवीन यादी जाहीर न करता सर्व बोगस नावे काढून टाकावीत, त्यासाठी निवडणूक आयोगाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा असे देखील ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

वाचा – अदानी वीजबिल म्हणजे जनतेची फसवणूक – संजय निरुपम

वाचा – मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस; निरुपम हटावची मागणी?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -