घरताज्या घडामोडी'जुनी थडगी काढू नका, तुमचेच सांगाडे सापडतील'

‘जुनी थडगी काढू नका, तुमचेच सांगाडे सापडतील’

Subscribe

जुनी थडगी उकरुन काढू नये, कारण ती उकरल्यास विरोधकांचेच सांगाडे सापडतील, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर केला आहे.

‘गेल्या वर्षभरात सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. विरोधकांकडून सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकार पुढील पाच वर्षे स्थिर राहणार नसल्याचे देखील विरोधकांकडून बोले गेले. मात्र, महाराष्ट्र सरकार पुढील पाच वर्षे स्थिर राहणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी खोटे-नाटे आरोप करणं बंद करावे. तसेच जुनी थडगी त्यांनी उकरुन काढून नयेत, कारण आम्हालाही थडगी उकरतात येतात. पण, आम्ही ती उकरली तर त्यात तुमच्याच पापांचेच सांगाडे जास्त सापडतील, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या गंभीर आरोपानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांवर केलेल्या आरोपांबाबत आम्ही काही बोलावे, अस कोणतेही मोठे आणि महान काम त्यांनी केलेले नाही. त्यांना त्यांच्या पक्षातही गांभीर्याने घेतले जात नाही. यामुळे अशा विधानांमुळे आपल्याच पक्षावरील लोकांचा विश्वास उडतो याचे त्यांनी भान ठेवावे. हे खोटे नाटे आरोप करणे बंद करावे, ‘जुनी थडगी आम्हालाही उकडता येतात. त्या थडग्यात तुमचेच सांगाडे सापडतील. त्यामुळे जुनी थडगी काढू नका. विरोधकांनी महाराष्ट्र राज्यात अनेक ऑपरेशन केली. त्यामुळे आता त्यांनी ऑपरेशनची भाषा बंद करावी. महाराष्ट्र राज्यात आता कोणतेही ऑपरेशन होणार नाही’, असेही ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना भाजपने दिली मोठी जबाबदारी; नाराज नेत्यांचे पुर्नवसन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -