घरदेश-विदेशदिल्लीत संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

दिल्लीत संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी साडे चार वाजेच्या सुमारास काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास पाऊणतास चर्चा झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात कुणासोबत सरकार स्थापन करायचे यावर चर्चा झाली नसल्याचे म्हटले. त्यामुळे शिवसेना पुन्हा कोंडीत सापडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचा नेमका अर्थ काय लावायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 पत्रकार परिषदेत शरद पवार काय म्हणाले?

“शिवसेनेबाबत सत्ता स्थापन करण्यासंबंधी अजून ठोस निर्णय झालेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र आघाडीत असलेल्या इतर पक्षांशी देखील चर्चा करणे गरजेचे आहे”, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत बोलू शकत नाही – राऊत

दरम्यान, शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, ‘सत्ता स्थापनेबाबत पवारांनी सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केली नसेल. तर त्याबाबत मी कसा प्रश्न विचारु? त्या पक्षाची स्वतंत्र्य अशी आघाडी आहे. पण नक्कीच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट दूर व्हावी या मताशी त्यांचे आणि आमचे एकमत आहे. तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर लवकरच मिळतील. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालू आहे, या विषयावर मी बोलू शकत नाही.’

शरद पवार आमचे नेते आहेत – राऊत

‘शरद पवार यांनी भेटायला गेलो हे खरे आहे. शरद पवार हे आमचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत. त्यांना भेटणे आणि काही विषयांवर चर्चा करणे हे माझे नित्याचेच आहे. खरे म्हणजे त्यांनी मी यासाठी भेटलो की आज सकाळीसुद्धा लोकसभेत शिवसेनेच्या आमच्या खासदारांनी महाराष्ट्रातील ओला दुष्काळासंदर्भात एक भूमिका घेतली. वॉक आऊट केले, आम्ही बाहेर आंदोलन केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. स्वत: उद्धव साहेब आणि पवार साहेब देखील अनेक जिल्हे फिरुन आले. अशावेळेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधानांकडे सध्य परिस्थितीची माहिती देणे जरुरीची आहे’, असेही राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -