Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कर नाही, त्याला डर कशाला?

कर नाही, त्याला डर कशाला?

ईडीच्या नोटीसीवरून संजय राऊत आक्रमक

Related Story

- Advertisement -

‘बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ, कर नाही त्याला डर कशाला?’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती.

गेल्या काही दिवसांपासून ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांवर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर उतरायचे तेव्हा ऊतरू.पण ह्या कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. शिवसेनेची शक्ती पाठीशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून शिवसेना नेत्यांना नोटीस बजावण्यात येत होत्या. त्यातच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ईडीकडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहितीही समोर येत होती. मात्र, या सर्व चर्चांना संजय राऊतांनी स्पष्टीकरण देत ब्रेक लावला आहे.

- Advertisement -