घरमहाराष्ट्र'अंगावर आलात तर...'; संजय राऊतांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा प्रोमो

‘अंगावर आलात तर…’; संजय राऊतांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा प्रोमो

Subscribe

संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो

राज्यातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूरतीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो संयज राऊत यांनी शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना संजय राऊत यांनी उद्या धमाका होणार असल्याचं पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे विरोधकांच्या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असे नाव देण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूरतीच्या निमित्त संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री हात धुवा याच्यापलीकडे काय सांगतात अशी एक टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. यासंबंधीबीही संजय राऊत यांनी विचारणा केली आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी, “हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन,” असा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंना हे सरकार आपल्याच ओझाने पडेल अशी अनेक ज्योतिषे आणि भाकिते वर्तवली जात आहेत अशी विचारणा केली. यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केले असून बोलणाऱ्यांचे दात पडायला आले आहेत असा टोला लगावला आहे. “सूडानेच वागायचे असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

- Advertisement -

“आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुले बाळे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतळ्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. विकृत बुद्धीचे चाळे करु नका. आव्हान मिळले तेव्हा स्फुर्ती येते. आडवे येणाऱ्यांना आडवे करुन महाराष्ट्र पुढे जाईल असेही उद्धव ठाकरे म्हणाल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -