घरमहाराष्ट्रसरपंच आरक्षण सोडत तारीख निश्चित!

सरपंच आरक्षण सोडत तारीख निश्चित!

Subscribe

21 फेब्रुवारीपर्यंत होणार सरपंच, उपसरपंच निवड

राज्यात जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंच, उपसरपंच निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचत आता ग्रामविकास विभागाने सरपंच, उपसरपंच निवडणुकाला कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 21 फेब्रुवारीपर्यंत तथा लवकरात लवकर सरपंच, उपसरपंच निवड होऊन पहिली ग्रामसभा घ्यावी, असे आदेश ग्राम विकास विभागाने दिले आहेत. आरक्षण जाहीर करुन सरपंच निवडीसाठी सात दिवसांची नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर एक दिवस निश्‍चित करुन त्याच दिवशी सरपंच निवडीच्या अनुषंगाने आरक्षणानुसार संबंधित उमेदवारांकडून अर्ज मागविले जातील. त्याच दिवशी अर्ज माघार व सरपंच निवड होईल, असा नियोजित कार्यक्रम ग्राम विकास विभागाने ठरविला आहे.

ग्राम विकास विभागाने सरपंच, उपसरपंच पदासाठी 11 आणि 16 डिसेंबरला दोन स्वतंत्र पत्र काढल्या होत्या. ११ डिसेंबरच्या पत्रानुसार 15 जानेवारीपासून महिनाभरात सरपंच, उपसरपंच निवड आणि पहिली ग्रामसभा व्हावी, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, पुन्हा त्यात बदल करुन ग्राम विकास विभागाने 16 डिसेंबरला नवे पत्र काढले. त्यानुसार 21 जानेवारीनंतर लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावी आणि सरपंच, उपसरपंच निवड करावी किंवा 15 जानेवारीपासून 30 दिवसांत आरक्षण जाहीर करुन 30 दिवसांत सरपंच निवड आणि पहिली ग्रामसभा घ्यावी, असे स्पष्ट केले. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत सरपंचपदांचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानुसार आता कार्यवाही सुरु झाली असून काही ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी 31 जानेवारीपर्यंत होणार असून उर्वरित ग्रामपंचायतींचा कारभारी 21 फेब्रुवारीपर्यंत ठरणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी सरंपच आरक्षण सोडत व निवडीचा कार्यक्रम तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांनीच बाजी मारली असून त्यात लॉकडाउन काळात गावी परतलेल्या युवकांचा सर्वाधिक समावेश आहे. तर महिला सदस्यांची संख्याही मोठी असल्याचे चित्र आहे. राज्यात एकूण २७ हजार ग्रामपंचायती आहेत. त्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यातील ८ हजार १९२ महिला सरपंच आहे तर पुढील टप्प्यात ५००० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -