Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सरपंच झाला, की येतो मृत्यू; भितीनं कुणी गावचा सरपंचच होईना!

सरपंच झाला, की येतो मृत्यू; भितीनं कुणी गावचा सरपंचच होईना!

सरपंचपदाची माळ अपशकुनी?

Related Story

- Advertisement -

कोणतीही निवडणूक असो त्याची लगबग ही प्रत्येक ठिकाणी जोरदार असतेच. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक पार पडल्या असून सरपंचपद निवडले गेले आहेत. दरम्यान एका गावची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ते गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असणारं राजपुरे गाव. एकीकडे सरपंच पद मिळावं म्हणून लाखो पैसे खर्च करून ते मिळावं म्हणून धडपड अनेक ठिकाणी केली जाते. मात्र या गावात सरपंच पद स्वीकारण्यास कोणीही तयार होताना दिसत नसल्याची चर्चा आहे.

सातारा जिल्ह्यातील पाचगणी तालुक्यातील राजापूर या गावात जवळपास गेले पाच वर्ष कोणीही सरपंच होण्यासाठी तयार नाही. ग्रामपंचायतीची सर्व जबाबदार आणि कारभार हा उपसरपंच संभाळत असल्याची माहिती आहे. मात्र या सरपंच पदाला नकार देण्यामागचं नेमकं कारण आहे तरी काय..? मिळालेल्या माहिती नुसार कारण जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील धक्का बसल्या शिवाय राहणार नाही.

म्हणून म्हणतात सरपंचपदाला ना ना!

- Advertisement -

अशी चर्चा सुरू आहे की, जो सरपंच होतो त्याचा सरपंच पदावर असतानाच मृत्यू होतो. ही दृढ अंधश्रद्धा या राजापुरे गावातील ग्रामस्थांमध्ये आहे. असे देखील सांगितले जाते की, वयवर्ष ४२ असणारे सत्वशिला राजपुरे, वयवर्ष ५० असणारे अशोक राजपुरे, वयवर्ष ५२ असणारे किसन राजपुरे आणि वयवर्ष ५५ असणारे रामचंद्र राजपुरे यांनी सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सरपंच पद स्वीकारल्यानंतर मृत्यू होतो अशीच चर्चा पूर्ण गावात सर्वत्र सुरू आहे. नुसती चर्चाचं नाही तर गावातला कोणताही व्यक्ती मी सरपंच होणार नाही, या निर्णयावर ठाम असल्याने गेले पाच वर्ष या गावाला सरपंचच नाही. सलग घडलेल्या या घटनांमुळे ग्रामस्थांनी सरपंच पदच नको असं म्हणत सरपंच पदही रिक्तच राहिलंय. त्यामुळे उपसरपंच या गावचा कारभार आज पर्यंत संभाळत आल्याचे सांगितले जात आहे.

अंधश्रद्धेविरोधात असणाऱ्या नव्या पिढीतील तरूणांच्या पुढाकाराने एक महिला सरपंच पदासाठी तयार झाली. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून कधीच या गावांमध्ये निवडणूक झाली नव्हती मात्र यंदा निवडणूक यशस्वी झाली त्यामुळे या महिलेचं कौतुक देखील केलं जात आहे. गावातील गावकऱ्यांच्या अंधश्रध्देच्या विचारापोटी गावच्या अनेक विकासकामांना आजपर्यंत अडथळा देखील निर्माण झाला. विशेष बाब म्हणजे साता-यात अंधश्रध्दा निर्मुलनाच्या चळवळीची सुरूवात झाली अशा सातारा जिल्ह्यातच अशा पद्धतीची विचारणी असणं गंभीर बाब आहे.

- Advertisement -