घरमहाराष्ट्र...आणि उदयनराजे कार्यकर्त्यांसाठी गाणं गायले

…आणि उदयनराजे कार्यकर्त्यांसाठी गाणं गायले

Subscribe

साताऱ्याच्या शाहू कलामंदिरामध्ये हा कार्यक्रम पार पडला. कै. प्रतापसिंहराजे भोसले महाराज यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार साताऱ्यातील जेष्ठ वकील धैर्यशील पाटील यांना देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यांचे भाषण असेल, त्यांचे डायलॉग्ज असतील त्याचसोबत नुकताच त्यांचा गाणं ऐकताना रडतानाचा व्हिडिओ हे आपण पाहिले आहेत. मात्र आता त्यांच्या एका गाण्याच्या व्हिडिओमुळे ते चर्चेत आले आहेत. उदयनराजे यांनी सभेमध्ये चक्क कार्यकर्त्यांसाठी गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात खासदार उदयनराजेंचं कार्यकर्त्यांवरचं भरभरुन प्रेम पाहायला मिळालं आहे. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसाठी भाषण करताना एक गाणं गायलं आहे. सभेला उपस्थित असलेल्या सातारकरांनी टाळ्या शिट्ट्यांनी प्रतिसाद दिला आहे.

प्रतापसिंहराजे भोसले महाराज पुरस्काराचे वितरण 

सातारा नगरपालिकेच्या पुरस्कार वितरणावेळी उदयनराजे गात होते. सातारा नगरपालिकेच्यावतीने जिल्हयातील नामांकित कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा कौतुक आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रमुख उपस्थिती लावली. साताऱ्याच्या शाहू कलामंदिरामध्ये हा कार्यक्रम पार पडला. कै. प्रतापसिंहराजे भोसले महाराज यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार साताऱ्यातील जेष्ठ वकील धैर्यशील पाटील यांना देण्यात आला. यावेळी उत्कृष्ट पत्रकार आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

‘हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जाणते’…

या पुरस्कार कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावलेल्या उदयनराजे यांच्या भाषणाकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. उदयनराजे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाषणासाठी उभ्या राहिलेल्या उदयनराजे यांनी नेहमीसारखे एका खास शैलीत आपल्या भाषणाची सुरुवात केली. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांवर खूश असलेल्या उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरुन गाणं गायलं. ‘हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जाणते’… हे गाणं उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांसाठी गायले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -