घरमहाराष्ट्रकोल्हापूरचा तिढा सुटला; सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री!

कोल्हापूरचा तिढा सुटला; सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री!

Subscribe

कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सतेज पाटील यांचीच वर्णी लागली असून हसन मुश्रीफ यांच्याकडे नगर देण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा अखेर सुटला असून, आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सतेज पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावरून सुरू असलेली नाराजी नाट्य आता थांबल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूरवर हक्क सांगणाऱ्या हसन मुश्रीफ यांना अहमदनगर तर सतेज पाटील यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरचे पालकमंत्री देण्यात आले होते. मात्र यावरून नाराजी नाट्य सुरू होते. अखेर आज आज कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुश्रीफ यांच्याकडे नगरचे पालकत्व कायम

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हसन मुश्रीफ देखील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना अहमदनगरचे पालकत्व देण्यात आले होते. त्यामुळे आता सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याने मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगरचे पालकत्व कायम राहिले आहे. विशेष बाब म्हणजे चार आमदार असल्याने सतेज पाटील यांनी पालकमंत्री पदाचा याआधी हक्क देखील सांगितला होता. त्यामुळे आता सतेज पाटील यांना पालकत्व देऊन काँग्रेसने पालकमंत्री पद स्वत:कडे ठेवले आहे.

- Advertisement -

विश्वजीत कदमांकडे भंडारा जिल्ह्याचे पालकत्व

दरम्यान, याआधी सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले होते. मात्र, आता सतेज पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आल्याने विश्वजीत कदम यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमत्री पद देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यमंत्री असलेल्या कदमांकडे आता आणखी एक जबाबदारी वाढली आहे.


वाचा सविस्तर – काँग्रेसचा निर्णय काय तो आम्ही घेऊ-थोरात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -