घरमहाराष्ट्रताडोबा भूसंपादनासाठी सल्लागार पशिने यांची नियुक्ती

ताडोबा भूसंपादनासाठी सल्लागार पशिने यांची नियुक्ती

Subscribe

ताडोबा येथील भूसंपादनासाठी सल्लागार अॅडव्होकेट सौरभ पशिने यांची नियुक्ती केली आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामांसाठी वापरण्यात येणार्‍या जागेच्या बदल्यात पर्यायी वनीकरणासाठी लागणार्‍या १९.४३ हेक्टर जागेची भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येत आहे. यासाठी अॅडव्होकेट सौरभ पशिने यांची नियुक्ती केली आहे. ही पर्यायी जागा ताडोबा आणि चंद्रपूर येथील असल्याने तेथीलच सल्लागाराची नेमणूक महापालिकेने केली आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प

मुंबई महापालिकेच्यावतीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार्‍या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या बोगद्याचे काम हाती घेण्यात येत आहे. यासंदर्भात वनखात्याच्या प्रादेशिक अधिकारीक समितीकडून गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत संजय गांधी उद्यानाखालून जाणार्‍या बोगद्याने बाधित होणार्‍या १९.४३ जमिनीच्या बदल्यात १९.४३ हेक्टर खासगी जमीन उपलब्ध करून देण्याची अट घालण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वॉर रुमच्या बैठकीत वन विभागास पर्यायी वनीकरणासाठी लागणारी जमिन सुचित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने वनखात्यासोबत चर्चा केली. त्यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत मोजे गोंड मोहाडी आणि मौजे वासनविहीरा जिल्हा चंद्रपूर येथे पर्यायी जमिन निश्चित केली आहे. या जमिनीच्या संपादनाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करणे आवश्यक आहे. अ‍ॅड. सौरभ पशिने हे वकील नागपूर येथे कार्यरत आहे. त्यांना भूसंपादनाचा आवश्यक अनुभव असून त्यांचे कार्यालय चंद्रपूर जवळ असल्यामुळे महापालिकेने काम सुरळीत होण्यास मदत होईल, असे रस्ते विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यासाठी विविध करांसहित २ लाख ७७ हजार रुपयांचा खर्च येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – डॉक्टरांकडून डिजिटल सह्यांचा गैरवापर सुरुच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -