घरमहाराष्ट्रभगवान गडावर भाजपचा दसरा मेळावा

भगवान गडावर भाजपचा दसरा मेळावा

Subscribe

बीड जिल्ह्यातील सावरगावच्या भगवान भक्तीगडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्याबद्दल भगवान गडावर अमित शहा यांना ३७० तोफांची सलामी दिली जाणार आहे. त्याचबरोबर ३७० तिरंग्या झेंड्यांनी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याशिवाय सभास्थळी एक लाख भगवे झेंडे लावण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या मेळाव्यासाठी अमित शहा औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले असून ते बीडकडे रवाना झाले आहेत.

भाजप भगवान गडावरुन फोडणार प्रचाराचे नारळ

बीड जिल्ह्याच्या परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यापुढे धनंजय मुंडे यांचे मोठे आव्हान आहे. या निवडणुकीत मुंडे बहिण-भावामध्ये चुरशीची लढत बघायला मिलणार आहे. दरम्यान, या मतदारसंघातून भाजप दसरा मेळाव्याच्या निमित्ताने प्रचाराचे नाराळ फोडत आहेत. विशेष म्हणजे अमित शहा यांच्या हस्ते हे प्रचाराचे नाराळ फोडले जाणार आहे. या मेळाव्यासाठी भगवान गडावर बारा एकर जागेवर दोन व्यासपीठ उभारले गेले आहेत. एका व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदी वरिष्ठ असतील. याशिवाय खासदार प्रीतम मुंडे रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -