घरमहाराष्ट्रसावरकरांच्या जीवनावरील ‘हे मृत्युंजय’चा प्रयोग आता जेएनयूतही

सावरकरांच्या जीवनावरील ‘हे मृत्युंजय’चा प्रयोग आता जेएनयूतही

Subscribe

जेएनयू म्हणजे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. हे विद्यापीठ नेहमीच चर्चेत असते. कधी या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कथित स्वैराचारामुळे तर कधी विद्यार्थ्यांकडून दिलेल्या देशविरोधी घोषणांमुळे. आता पुन्हा एकदा हे विद्यालय चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे डाव्या विचारसरणीच्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेल्या या विद्यापीठामध्ये चक्क सातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित ‘हे मृत्युंजय’ हे नाटक सादर होणार आहे. हे नाटक 13 ऑगस्टला सादर होणार असून याची तयारी देखील करण्यार आली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या नाटकाचे लेखक दिग्ददर्शन केले असून, हे नाटक आता देशभर दाखवण्यात येणार आहे.

म्हणून जेएनयुमध्ये सावकरांचा दुसरा प्रयोग
मार्च महिन्यात मृत्यूंजय या नाटकाचा प्रयोग जेएनयुमध्ये दाखवण्यात आला होता. त्यावेळी थोडाफार विरोध झाला होता. मात्र आता पुन्हा या नाटकाचा प्रयोग जेएनयुमध्ये दाखवण्यात येणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या विद्यापीठामध्ये यंदा नवीन ३००० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने या नाटकाचा दुसरा प्रयोग दाखवण्यात येणार असल्याचे सावरकर स्मारकाचे प्रमुख कार्यवाहक राजेंद्र वराडकर यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

तसेच जेएनयु याच विद्यापीठात नाहीतर देशभर या नाटकाचा प्रयोग दाखवून सावरकांचे हिंदुत्ववादी विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही ते म्हणालेत. विशेष बाब म्हणजे या नाटकाचा प्रयोग हा विनामूल्य पाहता येणार आहे. १२ तारखेला दिल्ली विद्यापीठ आणि १३ ऑगस्टला जेएनयुमध्ये या नाटकाचा प्रयोग दाखवण्यात येणार असून, त्यानंतर देशभरातील विविध विद्यापीठात या नाटकाचे प्रयोग दाखवण्यात येणार आहेत. दरम्यान, या नाटकाच्या प्रयोगाला जेएनयुच्या प्राध्यापकांकडून देखील परवानगी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सावरकर हे देशभरातील सर्वांचे प्रेरणास्थान आहे. या विद्यापीठात सावरकर सोडले तर इतिहासामधील अनेक घडामोडी सर्वांना माहिती आहेत. सावरकरांच्या अंदमानामधील घडामोडीही सर्व भारतीयांना ठाऊक नाहीत. म्हणून राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी सावरकरांचा विचार समजणे गरजेचे होते. ती गोष्ट या नाटकामधून मांडण्यात आली असल्यामुळे हा प्रयोग जेएनयुमध्ये होत आहे.
-प्रा. उमेश कदम, अधिष्ठाता जेएनयू

- Advertisement -

कनैय्या कुमार यांच्यासारख्यांनी जेएनयूमध्ये देशविरोधी विचार पोहोचवले होते. मात्र आता यावर्षी या विद्यापीठात नवीन ३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, या नव्या विद्यार्थ्यांपर्यंत सावरकरांचे विचार पोहोचावे हा यामागचा हेतू आहे. -राजेंद्र वराडकर, प्रमुख कार्यवाहक, सावरकर स्मारक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -