घरमहाराष्ट्र'डबल डेकर सरकार महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार'

‘डबल डेकर सरकार महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार’

Subscribe

केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांचे डबल डेकर सरकार महाराष्ट्राला संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल', असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित बनवला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकसित बनविण्याचे काम केले आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा बनवा, केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांचे डबल डेकर सरकार महाराष्ट्राला संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी सांगली जिल्ह्यात जाठ येथे विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत केले आहे.

काय म्हणाले अमित शहा?

रात्रंदिवस महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहे, असा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री आपण कधी पाहिला नाही. त्यांच्या मनात सदैव शेतकरी, युवक, उद्योग, सहकारिता यांच्या विकासाचा विचार असतो. त्यांच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंचन क्षेत्र ३२ लाख हेक्टरवरून वाढून ४० लाख हेक्टर झाले. रस्ते, जलयुक्त शिवार, सिंचन अशा अनेक क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने खूप चांगले काम केले आहे‘, असे देखील ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार यांनी सरकारला काय दिले?

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात वसंतराव नाईक वगळता एकही मुख्यमंत्री सलग पाच वर्षे पदावर राहिला नाही, कारण दिल्लीचे सत्ताधारी सातत्याने मुख्यमंत्री बदलत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी स्थिरतेसह महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर पुढे नेले आहे. फडणवीस सरकारने केलेल्या कामांची मोठी यादी आपण वाचू शकतो. शरद पवार यांनी मात्र, सांगलीला हिशोब दिला पाहिजे की, त्यांच्या सरकारने महाराष्ट्राला काय दिले‘, असे म्हणत अमित शहा यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.


हेही वाचा – भाजपच्या लोकांमुळे PMC बँक बुडाली – राज ठाकरे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -