घरमहाराष्ट्रकर्जतमध्ये सर्व शिक्षा अभियानाचा खेळ मांडला !

कर्जतमध्ये सर्व शिक्षा अभियानाचा खेळ मांडला !

Subscribe

शिक्षकांची सोयीनुसार शाळा,विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बोळा

कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी नादुरुस्त इमारती, शिक्षकांची कमतरता, तर दुर्गम भागात शिक्षक सोईनुसार हजेरी लावत असल्याने सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फसला गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीन तेरा झाले असून चिंतीत झालेले पालक संताप व्यक्त करत आहेत.

सर्व मुलांना शिक्षणाच्या अधिकारानुसार दुर्गम भागातदेखील शाळा आहेत. मात्र यापैकी बहुतेक शाळांचे शिक्षक सोयीनुसार शाळेत हजेरी लावत असून, सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेपूर्वीच ते ट्रेन किंवा अन्य वाहन पकडण्यासाठी लवकर पळ काढत असल्याचे समोर आले आहे. अशा शिक्षकांवर लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच शिक्षण विभागाचा धाक नसल्याने या शिक्षकांना मोकळे रान मिळाले आहे. सोमवारी कळंब ग्रामपंचायत हद्दीतील सुतारपाडा येथील प्राथमिक शाळेतील दोन्ही शिक्षक बँकेत काम असल्याचे कारण सांगून दीड तास उशिरा आले. तोपर्यंत कंटाळलेले अर्धे विद्यार्थी घरी निघून गेले, तर इतर विद्यार्थांनी शाळेच्या बाहेर आपला खेळ मांडला.

- Advertisement -

नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळेवाडी येथे दुपारी १२ वाजेपर्यंत शिक्षक गायब असल्याने विद्यार्थांनी देखील वर्गातून घरी पळ काढला होता. दुर्गम भागातील अशा अनेक शाळांमधील शिक्षक हे आपल्या सोईनुसार शाळेत येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. यात होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल पालक आणि ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

ग्रामीण भागात शिक्षक शाळेत वेळेवर जात नसल्याची तक्रार आली आहे. त्यानुसार पंचायत समितीमध्ये चर्चादेखील झाली आहे. त्यामुळे भरारी पथके नेमून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अशा शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.           -धनसिंग राजपूत, प्रभारी गट शिक्षणाधिकारी

- Advertisement -

शिक्षकांच्या मनमानीमुळे आमच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, ही मनमानी वेळीच रोखली गेली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल.
-जैतू पारधी, माजी अध्यक्ष, आदिवासी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -