घरमहाराष्ट्रपुण्यात ४ जानेवारीपासून शाळा सुरू

पुण्यात ४ जानेवारीपासून शाळा सुरू

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध करणाऱ्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता पुण्यातील शाळा या ४ जानेवारी पासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात असलेले नववी ते बारावी पर्यतचे वर्ग ४ जानेवारी पासून सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध करणाऱ्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

- Advertisement -

शाळा सुरू करण्याआधी शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाला देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. शाळेत नियमितपणे सॅनिटायझेशन त्याचबरोबर थर्मल स्कॅन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी, सॅनिटायझर यासांरख्या वस्तू जवळ ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नियमित विद्यार्थी तसेच शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करणेही बंधनकारक असणार आहे.

नाशिक नंतर आता पुण्यातही शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील शाळा कधी सुरू होतील याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. कोरोना लॉकडाऊनपासून शाळा तसेच कॉलेजही ऑनलाइन माध्यमातून सुरू आहेत. त्यामुळे मुंबईत शाळा कॉलेज सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात ३,५८० नवे रुग्ण, ८९ जणांचा मृत्यू

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -