घरCORONA UPDATEपुण्यात १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच!

पुण्यात १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच!

Subscribe

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यानंतर आधी मुंबई महानगर पालिका आणि नंतर ठाणे जिल्ह्यातल्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता पुणे जिल्ह्यासाठी देखील असाच निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय न घेता १३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला असून १३ तारखेला पुढील निर्णय घेतला जाईल, असं पुणे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुण्याआधी औरंगाबाद महानगर पालिकेने देखील ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यात पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत पुण्यात १ लाख ६२ हजार ६४७ कोरोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी १ लाख ५२ हजार ८४१ रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, ४ हजार ३०९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू देखील ओढवला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करून कोरोनाचा धोका अधिक वाढवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने नकार दिला असून किमान १३ डिसेंबरपर्यंत पुण्यातल्या शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातल्या ९वी ते १२वीपर्यंत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाने त्यानुसार निर्णय घ्यावेत, असेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेळी शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार म्हणून पालकांंच्या मनात भिती निर्माण झाली होती. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुलांना शाळेसाठी घराबाहेर पाठवण्यासाठी पालकांची इच्छा होत नव्हती. अखेर, स्थानिक प्रशासनाने तूर्तास शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेऊन पालकांना एक प्रकारे दिलासाच दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -