घरमहाराष्ट्रकर्जतमधील वर्षासहलींना अतिउत्साहाचा शाप!

कर्जतमधील वर्षासहलींना अतिउत्साहाचा शाप!

Subscribe

अखेर उशिरा का होईना तो हळहळू एकेक पाऊल टाकत पुढे सरकतोय, कुठे हलक्या सरी तर कुठे मुसळधार. लवकरच तो सर्व महाराष्ट्र व्यापेल. जोरदार बरसू लागेल, कोरडे पडलेल्या नद्या नाले दुथडी भरून तर तलाव ओसंडून वाहू लागतील. डोंगर कपारीतून धो धो कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे एकमेकांशी स्पर्धा करू पाहतील. मग सगळ्यांना वेध लागतील ते या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी वर्षा सहलींचे. मात्र मागील काही वर्षातील वर्षा सहलींचा आढावा घेतला तर कर्जतमध्ये वर्षा सहलीसाठी आलेल्या जवळजवळ 25 ते 30 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 13 ते 14 जणांचा मृत्यू मागील वर्षी झाला. त्यामुळे वर्षासहलीचा आनंद घेताना अतिउत्साहामुळे आपला कडेलोट होणार नाही, याची पर्यटकांना काळजी घेण्याची गरज आहे.

येथे सह्याद्रीच्या पवर्तरांगा असल्याने पावसाळ्यात येथे अनेक छोटे मोठे धबधबे हमखास पहायला मिळतात. कर्जत तालुक्यात आषाणे, कोषाणे, वदप, सोलन पाडा डॅम, पळसदरी डॅम, भूतीवली डॅम असे अनेक प्रसिद्ध नयनरम्य धबधबे, डॅम आहेत. दरवर्षी येथे पावसाळ्यात वर्षा सहलींच्या निमित्ताने पर्यटकांचासुद्धा वर्षाव होतो. या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाची संधी मिळत असली तरी योग्य नियोजनाअभावी या वर्षासहली स्थानिक ग्रामस्थांसहित शासकीय यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत.

- Advertisement -

वर्षा सहलीसाठी आलेल्यांमध्ये जास्त करून तरुणाई असते. बहुतेकांनी मद्य प्राशन केलेले असते. त्यामुळे दारूच्या नशेत ते दूरवर खोल पाण्यात पोहत जातात, मात्र काही वेळातच त्यांची दमछाक होते आणि ते बुडू लागतात. वर्षा सहलीसाठी येणारे पर्यटक मुंबई उपनगर आदी मोठ्या शहरातून आलेले असतात. खोलीचा अंदाज न घेता तरुण सूर मारतात आणि कधी कधी पाण्याखाली खडकावर दगडावर डोकं आपटून ते गंभीर जखमी होतात. अनेक वर्षांपासून धरणांमधील गाळ काढण्यात आलेला नसल्याने त्या गाळात रुतून तसेच जलपर्णीच्या विळख्यात अडकून काही मृत्युमुखी पडतात.

तालुक्यातील सोलनपाडा डॅमवर पर्यटकांची अधिक गर्दी उसळते, मात्र मागील तीन वर्षात सात ते आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याने तेथे बंदी घालण्यात आली आहे. तहसीलदारांनी मनाई हुकुमाचे फलकही लावले, तरीसुद्धा काही अति उत्साही पर्यटक जातातच. अखेर पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -