घरमहाराष्ट्र'पाकिस्तान की जय हो' अशी फेसबुक पोस्ट करणाऱ्या शिक्षिकेला अटक

‘पाकिस्तान की जय हो’ अशी फेसबुक पोस्ट करणाऱ्या शिक्षिकेला अटक

Subscribe

बेळगाव मधील एका २३ वर्षीय मुस्लीम तरूणींने पाकिस्तानचा जयजयकार केला आहे. तिने सोशल मीडियावर 'पाकिस्तान की जय हो' असे पोस्ट केले आहे. त्यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशदवादी हल्ल्यामध्ये ४० हून अधिक जवान शहीद झाले. एकीकडे या हल्ल्यानंतर देशामधील प्रत्येक नागरिकाच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या स्तरावरून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र, दुसरीकडे बेळगावमध्ये सोशल मीडियावर एका मुस्लीम तरुणीने देशविरोधी पोस्ट केली आहे. त्यामुळे बेळगावमधील वातावरण तापले आहे. जेलियका ममाडापूर असे या तरुणीचे नाव असून ही २३ वर्षाची आहे. या तरूणीने ‘पाकिस्तान की जय हो’ तसेच पाकिस्तानाचा झेंडा सोशल मीडियावर पोस्ट केला होते. त्यामुळे तिथले नागरिक संत्पत झाले आहेत. त्या रागामध्ये संत्पत नागरिकांनी तिचे घर देखील पेटवून दिले आहे. पोलिसांनी त्या तरूणी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

जेलियका ममाडापूर ही तरूणी एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे. ही बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील कडली-शिवापुर गावातील रहिवासी आहे. तिने तिच्या फेसबुक आणि व्हॅाट्सअॅप या सोशल साईटवर पाकिस्तानचा झेंडा आणि पाकिस्तानचा जय जयकार केला होता. त्यामुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी तिचे घर पेटवून दिले. तसेच मुरुगोड पोलिसांनी या तरुणी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ परिसरातील नागरिकांनी कडक बंद पाळला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -