घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रासाठी तातडीच्या मदतीची मागणी

महाराष्ट्रासाठी तातडीच्या मदतीची मागणी

Subscribe

पवारांची आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी चर्चा

राज्यात करोनाचा संसर्ग वाढत चालला असून या चिंताजनक परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्राने केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. यासाठी राज्य सरकारला कायम मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आता या परिस्थितीवर मात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. पवारांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना फोन केला आणि 20 मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली.

राज्यातील करोनाबाधितांचा आकडा 52 वरून 6४ वर गेल्यानंतर प्रत्येकाची चिंता वाढली आहे. करोना चाचणीसाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या मदतीची गरज असल्याचे सांगत शनिवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि परिस्थितीची त्यांना माहिती दिली. राज्य सरकार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना उपकरणे देण्यासाठी तयार आहे; पण या वैद्यकीय महाविद्यालयांना करोना चाचणीची किट उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, असे पवार यांनी हर्षवर्धन यांना सांगितले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयुक्त निर्णयांसाठी शरद पवार ओळखले जातात. करोनाच्या परिस्थितीतही शरद पवार लक्ष ठेवून आहेत.

- Advertisement -

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात शरद पवार स्वतः दुवा बनल्यामुळे समन्वय अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने राज्याला करोना चाचणीची परवानगी द्यावी, त्यासाठी केंद्राने किट द्याव्यात, असे राजेश टोपे म्हणाले. जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. ‘घरातील, ऑफिसमधील एसी बंद ठेवा. लोकलचा वापर टाळा. रेल्वे स्थानकांतील गर्दी कमी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतून बाहेर जाणार्‍या रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -