घरमहाराष्ट्र'युती' म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड - मुख्यमंत्री

‘युती’ म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड – मुख्यमंत्री

Subscribe

'सेना-भाजपमधील ही युती विचारांची युती आहे. त्यामुळे ती अजूनही टिकून आहे आणि भविष्यातही टिकणारी आहे', असं वक्तव्यं मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. 

‘युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे, इतक्या सहज तुटणार नाही’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज अमरावती येथे प्रचार सभेदरम्यान बोलत होते. शिवसेना-भाजप युतीनंतरची ही पहिलीच प्रचारसभा सभा आज अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी युतीविषयी आपलं मत मांडताना फडणवीस म्हणाले की, ‘दोन्ही पक्षांमध्ये झालेली युती ही अभेद्य आहे. सेना आणि भाजप या दोन्ही पक्षात भांडण लागावं यासाठी देव पाण्यात ठेवून बसले होते. मात्र, ही सत्ता निवडणुकीपूर्ती नाही’. ‘सेना-भाजपमधील ही युती विचारांची युती आहे. त्यामुळे ती अजूनही टिकून आहे आणि भविष्यातही टिकणारी आहे’, असं वक्तव्यं मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. अमरावती येथे शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राला भगवे करणार…

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवरदेखील टीका केली. ‘शिवसेना-भाजपा युतीसमोर आता कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही. एक माघार घेतो, दुसरा म्हणतो मी उभा राहणार नाही’, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना हाणला. फडणवीस पुढे म्हणाले की, ‘देश महत्वाचा आहे गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या.तो आपला रेकॉर्ड नव्हता. खरा रेकॉर्ड तर २०१९ मध्ये करायचा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला पूर्ण ताकदीनीशी भगवे केल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

- Advertisement -

एकजुटीने काम करु…

‘दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनो काळजी करु नका, आपण एकजुटीने काम करू’, अशी हाक मुख्यमंत्र्यांनी कामगारांना दिली. ‘ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे भाजपचे कार्यकर्ते जिवाचं रान करतील आणि जिथे भाजपचे उमेदवार आहेत त्याठिकाणी शिवसैनिकांचे बळ मिळेल’, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला, उजाला, प्रधानमंत्री जनारोग्य, शेतकरी सम्मान निधी तसंच गरिबांसाठी राबवलेल्या अनेक योजनांचीही माहिती दिली. ”कल तक जो नामुमकिन था अब वो मुमकिन है” असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचा जोश वाढवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -