पिंपरीत डंपरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; गुन्हा दाखल

कचरा वाहतूक करणार्‍या डंपर चालकाने डंपर पाठीमागे घेत असताना निष्काळजीपणा केल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

child dead four wheeler dash incident chinchwad
भरधाव चारचाकीने धडक मारल्याने चिमुरड्याचा मृत्यू

कचरा वाहतूक करणार्‍या डंपर चालकाने डंपर पाठीमागे घेत असताना निष्काळजीपणा केल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी दहा वाजता बिजलीनगर येथे घडली. बजरंग जोरकर (वय ६५) असे अपघातात ठार झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी अर्चना विकास पवार (वय ३०, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश उत्तम जाधव या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश जाधव हा (एमएच-१४, ७३२८) या डंपरवर चालक म्हणून कार्यरत आहे. गुरूवारी सकाळी बिजलीनगर येथे कचरा भरल्यानंतर आरोपी डंपर मागे घेत होता. त्याने पाठीमागे न पाहता डंपर मागे घेतल्याने फिर्यादी यांचे वडिल जोरकर यांना डंपरचा धक्का बसला. त्यामुळे ते खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रकरणी फौजदार अटवे तपास करत आहेत.

हेही वाचा –

आता त्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार – उद्धव ठाकरे