घरताज्या घडामोडीज्येष्ठ नेत्यांनी जाणीवपूर्वक मराठा आरक्षण प्रलंबित ठेवलं; उदयनराजेंचं टीकास्त्र

ज्येष्ठ नेत्यांनी जाणीवपूर्वक मराठा आरक्षण प्रलंबित ठेवलं; उदयनराजेंचं टीकास्त्र

Subscribe

मराठा आरक्षणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत ज्येष्ठ नेत्यांवर टीकेची तोफ डागली आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले असून राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत आणि आता तेच नेते आता सत्तेत आहेत, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात, असा सवाल देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

“मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत नाही आहे, तर शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवर आधारित समाजाच्या भूमिकेतून बोलत आहे. आपल्या आधीची जी पिढी राजकारणात आहे त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित का ठेवला? हा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला आहे. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहे. आपली पुढची पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा शरमेने मान खाली घालावी लागेल. या नेत्यांनी याचे उत्तर द्यावे कारण आजही तेच सत्तेत आहेत,” असे उदयनराजे भोसले म्हणाले.

- Advertisement -

उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका करताना म्हणाले की, विश्वासघात झाला तर लोक तुम्हाला खाली खेचतील. तुमची इच्छा असेल तर हो म्हणा नाही तर लोक तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. क्रियेला प्रतिक्रिया झाली तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. आता कोरोनाचा काळ आहे म्हणून लोक घरात आहेत. जातीचे राजकारण कधीपर्यंत करणार समस्यांवर राजकारण करणार आहात की नाही, असा सवाल देखील त्यांनी केला.

मराठा समाजानं काय पाप केलंय?, उदयनराजेंचा सवाल 

आतापर्यत मराठा मोर्चे निघाले हिंसा झाली नाही, पण आता किती दिवस मागत रहायचे, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, अजूनही ते सत्तेत आहे. त्यांना सखोल माहिती आहे, एवढे वर्ष मराठा समाजाचा प्रश्न प्रलंबित का राहिला? मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही? मराठा समाजाचा सोयी प्रमाणे विसर पडला. हा राज्यस्तरीय विषय आहे, यात राज्याने पुढाकार घ्यायला हवा होता. त्यावेळी जे कोणी पुढारी होते त्यांनी यावर भाष्य करावे, मराठा समाजातील तरुण तरुणींची ही मागणी आहे. इतरांचे आम्हाला मागायचे नाही, एखादा मराठा मोर्चा निघाला की त्याला काउंटर करायला दुसरा मोर्चा कशासाठी? मराठा समाजाने अस काय पाप केलंय? शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव हा विचार दिला, आज या लोकांनी जाती जातीत तेढ निर्माण करण्याच पाप केले, असे उदयनराजे म्हणाले.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -