घरताज्या घडामोडीइंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबत राऊत म्हणतात...

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबत राऊत म्हणतात…

Subscribe

संजय राऊत यांनी एका कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लाला यांना भेटायच्या असे विधान केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

‘ज्या – ज्यावेळी इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. मात्र, काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत’, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लाला यांच्यातील भेटीबाबत केले आहे. त्यांच्या या खुलाशानंतर वादाला तोंड फुटले आहे.

- Advertisement -

‘इंदिरा गांधींबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर टीका झाली त्यावेळी आम्ही त्यांना पाठिंबा दिला. तसेच मी केलेल्या त्या विधानाबाबत म्हणायचे कर करीम लाला हे अफगाणिस्तानातून आले होते. त्यांची पश्तून ए हिंद नावाची संघटना होती. सरहद्द गांधी म्हणून ओळख असलेल्या खान अब्दुल गफ्फार खान यांच्याशी करीम लाला जोडलेले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत. तसेच भारतातील पठणांच्या समस्यांबाबत ते इंदिरा गांधींना भेटले होते, असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

- Advertisement -

दरम्यान, ‘पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह संपूर्ण नेहरु गांधी परिवाराचा आम्ही विरोधी पक्षात असूनही नेहमीच आदर केला’, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.

महाराज विश्वाचे दैवत

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आणि देशाचे नव्हे तर विश्वाचे दैवत आहे. आम्हाला शिवरायांबाबत सार्थ अभिमान आहे. तसेच जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे.

दरम्यान, इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबत विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले आहे की, काँग्रेस नेते गुन्हेगारांबरोबर उठबस करतात. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जनतेसमोर याबद्दल खुलासा करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होते का? यापेक्षा जास्त बदनामीकारक काही असू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.


हेही वाचा – सातारा: राऊत आणि आव्हाडांच्या नावाची पाटी गाढवाला लावून काढली धिंड


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -