राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनाने निधन!

दशरथ पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांच कोरोनामुळे निधन झालं आहे. चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम सुरू करणारे जिल्हा परिषद सदस्य अशी त्यांची ओळख होती. दशरथ पवार हे नाथपंथीय साधूंच्या कुंभमेळा समितीचेही अध्यक्षही होते.

मागील काही दिवसांपासून त्यांची कोरोनाशी झुंज सुरू होती. अखेर ही झुंज अपयशी ठरली. दशरथ पवार यांना मधुमेह, रक्तदाब आदी आजारही होते. पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते ६७ वर्षांचे होते.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर पवार हे जुन्नर तालुका पंचायत समितीचे सन १९९२ ते १९९७ या सलग पाच वर्षांत सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार मिळाला होता. दशरथ पवार यांचे मूळ गाव पारुंडे. इथं भरणाऱ्या नाथपंथीय साधूंच्या कुंभमेळा समितीचे ते अध्यक्ष होते. गावात एकोपा रहावा, यासाठी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असे.


हे ही वाचा – Coronavirus Maharashtra: कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५ लाखांच्या वर पोहोचला